पीएफ अकाऊंट (PF Account) मध्ये 2.50 लाखापेक्षा अधिक रक्कम जमा असल्यास त्यावर मिळणार्या व्याजावर आता सरकारकडून टॅक्स (TAX) लावला जाणार आहे. दरम्यान यंदा ईपीएफओने देखील 2021-22 या चालू आर्थिक वर्षामध्ये व्याज दर घटवून 8.1% केला आहे. आता नव्या नियमानुसार कोणत्याही आर्थिक वर्षामध्ये जर पीएफ खात्यामधील जमा रक्कम 2.5 लाखांची मर्यादा पार करत असल्यास त्यावर मिळणार्या व्याजावर टॅकस लावला जाणार आहे.
सीबीडीटी ने दिलेल्या माहितीनुसार, संस्थांना सूचित करण्यात आले आहे की त्यांनी दोन स्वतंत्र पीएफ खाती बनवावीत. यापैकी एक करपात्र योगदानासाठी असेल तर दुसरा गैर करपात्र योगदानासाठी 1 एप्रिल 2021 पासून लागू होईल. ईपीएफमध्ये करपात्र खात्यात जमा केलेल्या योगदानावर मिळणाऱ्या व्याजावर कर आकारला जाईल.
टॅक्सचं गणित कसं असेल?
जर आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये ईपीएफ मध्ये 1.5 लाख रूपये आणि वॉलेंटेयरी प्रॉविडेंड फंड खात्यात 1.5 लाख योगदान असेल. आता 1 एप्रिल 2021 पर्यंत पीएफ खात्यात 20 लाख रूपये जमा आहेत. त्याच वेळी, 2021-22 या आर्थिक वर्षात भविष्य निर्वाह निधी खात्यात जमा केलेले एकूण योगदान रुपये 3 लाख आहे. या प्रकरणात, 2.5 लाख रुपयांचे EPF योगदान नॉन-टॅक्सेबल खात्यात जमा केले जाईल आणि 50,000 रुपये करपात्र खात्यात जमा केले जातील. 31 मार्च 2022 पर्यंत गैर-करपात्र खात्यातील शिल्लक ₹22.5 लाख असेल (1 एप्रिल 2021 पर्यंत उघडण्याची शिल्लक करपात्र आहे), आणि करपात्र खात्यातील ₹50,000. म्हणजेच 2021-22 या आर्थिक वर्षासाठी 50,000 रुपयांवर 8.5% व्याज द्यावे लागेल.
20 पेक्षा जास्त कर्मचारी असलेल्या कोणत्याही फर्ममध्ये 15,000 रुपयांपर्यंत दरमहा कमाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी EPF खाती अनिवार्य आहेत.