रिर्झव्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India) जारी केलेले नवे नियम आणि इतर बँकांनी केलेल्या अपडेटनुसार उद्यापासून बँकिंग सेक्टरमध्ये बदल घडून येणार आहेत. या बदलामुळे खातेधारकांच्या दैनंदिन व्यवहारावर परिणाम होणार आहे. ईएमआय (EMI) भरणारे आणि वेतनधारक यांना या नियमांचा फायदा होणार असून एटीएम कार्डचा अतिवापर करणाऱ्यांना या नियमामुळे चिमटा बसणार आहे. तर जाणून घेऊया 1 ऑगस्टपासून बदलले जाणारे नियम... (बँकींग क्षेत्रासह दैनंदिन जीवनातील वस्तूंमध्ये 1 जुलै पासून झाले 'हे' मोठे बदल; वाचा सविस्तर)
1 ऑगस्ट पासून बदलले जाणारे नियम:
NACH सर्व दिवशी उपलब्ध:
National Automated Clearing House (NACH) हे एक बल्क पेमेंट सिस्टम असून याचा वापर वेतन, पेन्शन, डिव्हिडन्ट्स प्रोसेस करण्यासाठी बँकेद्वारे केला जातो. यासोबतच विजेचे बिल, गॅस, टेलिफोन, लोनचे ईएमआय, म्युच्युअल फंडचे इन्व्हेस्टमेंट आणि इन्शोरन्स प्रिमियम यांचा देखील यामध्ये समावेश होतो. एनसीएच 1 ऑगस्टपासून आठवड्याचे सर्व दिवस चालू राहणार आहे.
Interchange Fees मध्ये वाढ:
या नियमाची घोषणा आरबीआयकडून जून 2021 मध्ये करण्यात आली होती. या नियमानुसार, इतर बँकांच्या एटीएममधून पैसे काढणे आता ग्राहकांना महाग पडणार आहे. यापूर्वी Interchange fees 15 रुपये इतकी होती. त्यात वाढ करुन ती आता 17 रुपये करण्यात आली आहे. Interchange fees ही एटीएम सुरु झाल्यापासून 9 वर्षानंतर वाढवण्यात आली आहे. यापूर्वी ऑगस्ट 2012 मध्ये Interchange fees वाढवण्यात आली होती.
IPPB च्या चार्जेसमध्ये बदल:
IPPB चे अकाऊंट वापरणाऱ्या ग्राहकांना आतापर्यंत विनामुल्य घरपोच सुविधा मिळत होती. परंतु, 1 ऑगस्टपासून प्रत्येक रिक्यूवेस्ट मागे 20 रुपये +जीएसटी आकारण्यात येणार आहे.
ICICI Bank च्या चार्जेसमध्ये बदल:
आयसीआयसीआय बँकेने ग्राहकांच्या कॅश ट्रान्झॅक्शन, एटीएम ट्रान्झॅक्शनवर मर्यादा आणली आहे. यासोबतच सेव्हींग अकाऊंट असणाऱ्या ग्राहकांना चेकबुक चार्जेस देखील लागू होणार आहेत. पैसे भरणे आणि काढण्यावर ग्राहकांना चार्जेस लागू शकतात. बँकेत अकाऊंट असणाऱ्या ग्राहकांना 4 मोफत ट्रान्झॅक्शन मिळणार आहेत.
LPG सिलेंडरच्या दरात बदल:
दर महिन्याच्या पहिल्या तारखेला एलपीजीचा रिव्ह्यू होतो आणि त्यानुसार सिलेंडरचे दर ठरवले जातात. यावर आंतरराष्ट्रीय बाजारातील तेलाच्या किंमतीचाही परिणाम होता. 1 ऑगस्ट पासून एलपीजीचा नवा रिव्ह्यू सुरु होणार असून त्यानुसार सिलेंडरचे दर बदलण्याची शक्यता आहे.
या बदललेल्या नियमांमुळे लोनचे हफ्ते भरणाऱ्यांनी, इन्शोरन्स प्रिमियम भरणाऱ्यांनी अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. यासोबतच आपले खाते असलेल्या बँकेच्या एटीएममधूनच पैसे काढणे सोईस्कर ठरेल. अन्यथा तुम्हाला अधिक चार्जेस भरावे लागू शकतात.