प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-ट्वीटर)

ज्यांना पैसे सरकारी स्कीम मध्ये गुंतवायचे असतील अशांसाठी भारतीय पोस्ट ऑफिसची सेव्हिंग स्किम एक चांगला पर्याय आहे. पोस्टाच्या या स्कीम मध्ये तुम्हांला पैसे गुंतवल्यास 6.6% व्याज प्रतिवर्षी मिळू शकणार आहे. ज्यांना याबद्दल अधिक माहिती हवी आहे ते इंडिया पोस्टची (India Post) अधिकृत वेबसाईट indiapost.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊ शकतात.

नुकतच इंडिया पोस्ट कडून या सेव्हिंग स्कीम बाबत अधिकृत वेबसाईट वर पोस्ट देखील करण्यात आलं आहे. 'Monthly Income Account मध्ये गुंतवा आणि वर्षभराच्या प्रत्येक महिन्याचं 6.6% व्याज मिळवा. ' असं त्यामध्ये सांगण्यात आले आहे. हे देखील नक्की वाचा: Bitcoin: बिटकॉइन म्हणजे काय? कशी होते गुंतवणूक? कशी वाढते पैशांची किंमत?

पहा ट्वीट

किमान आणि कमाल गुंतवणूक कितीची?

पोस्ट ऑफिसच्या या स्कीममध्ये पैसे गुंतवताना तुम्ही किमान 1000 रूपयांपासून सुरूवात करू शकता. तसेच 1000 च्या पटीमध्ये तुम्ही यामधील रक्कम वाढवू शकता. एका अकाऊंट मध्ये कमाल 4.5 लाख रूपयांची गुंतवणूक केली जाऊ शकते. जॉईंट अकाऊंट असल्यास ही रक्कम कमाल 9 लाख असू शकते. जॉईंट अकाऊंट मध्ये शेअर देखील समान असणार आहे.

कोण अकाऊंट बनवू शकतं?

अकाऊंट एखादी प्रौढ व्यक्ती देखील बनवू शकते. जॉईंट अकाऊंट मध्ये 3 प्रौढ व्यक्तींचाही समावेश असू शकतो. अल्पवयीन, मानसिकदृष्ट्या सक्षम नसलेल्या व्यक्ती यांच्या पालकांकडे व्यवहार असेल. 10 वर्षांवरील अल्पवयीन असल्यास त्याच्या नावावर अकाऊंट सुरू करता येऊ शकतं.

व्याजाबद्ददल काही खास गोष्टी

अकाऊंट उघडल्याच्या तारखेनुसार पॉलिसी मॅच्युअर होईपर्यंत व्याज दिले जाणार आहे. जर अकाऊंट होल्डर कडून दर महिन्याला व्याज न घेतल्यास त्यांना त्यावर अधिकचे व्याज मिळणार नाही. जर अधिकची रक्कम खातेदाराकडून जमा झाल्यास ती रिफंड केली जाईल. सेव्हिंग़ अ‍काऊंट मधून ऑटो क्रेडिटने व्याज घेतले जाऊ शकते. खातेदारांना मिळणारे व्याज हे टॅक्सेबल असणार आहे.

दरम्यान या स्कीम मध्ये अर्जाद्वारे अकाऊंट तयार केल्यानंतर 5 वर्षांनी ते बंद होईल. मॅच्युरिटी पूर्वी एखादी व्यक्ती मृत्यू पावल्यास अकाऊंट बंद होईल आणि रक्कम त्यांच्या नॉमिनी कडे दिली जाईल.