Mutual Fund Investment | Representational purpose Only (Photo Credits: Pixabay.com)

गुंतवणूक (Investment ) करण्यासाठी आजकार अनेक पर्याय उपलब्ध आहेत. गुंतवणुकीत जोखीम जेवढी मोठी तेवढा परतावा अधिक मिळण्याच्या शक्यताही तितक्याच मोठ्या. परंतू, वय आणि एकूण उत्पन्न या गोष्टी ही जोखीम घेण्यासाठी अधिक महत्त्वाच्या ठरतात. अशा वेळी, पोस्टातील गुंतवणूक (Post Office Investment ) ही सर्वार्थाने फायद्याची ठरते. तुम्ही जर पोस्टात आरडी (Post Office RD) केलीत. तर, किती आणि कसा परतावा मिळू शकतो याबाबत कधी विचार केला आहे काय? खरेतर बहुतांश लोकांनी नाही. ज्येष्ठ आणि जुने जाणते लोक वगळता तरुण वर्ग फारसा पोस्टाकडे आणि त्यातही गुंतवणुकीकडे वळताना दिसत नाही. परंतू, विचारपूर्वक आणि योग्य कालावधीसाठी ध्येय निश्चिती करुन गुंतवणूक केल्यास पोस्टातील गुंतवणुकीचा परतावा चांगला मिळू शकतो. कसे? घ्या जाणून.

म्युच्युअल फंड प्रकारात गुंतवणुकीसाठी तुम्ही जर एसआयपी (SIP) सारखा पर्याय वापरत असाल तर त्यासाठी तुम्हाला प्रतिमहिना पैसै गुंतवावे लागतात. ही गुंतवणूक तुम्ही 500 रुपयांपासून सुरु करु शकता. ही गुंतवणूक पूर्णपणे बाजारातील तत्कालीन स्थिती आणि तुमचे नशिब यावर अवलंबून असते. त्यामुळे सर्वसाधारणपणे मानले जाते की, एसआयपीमध्ये 15% ते 16% परतावा मिळतो. तुम्ही जर अधिक नशिबावान असाल तर तुम्हाला त्याहीपेक्षा अधिक परतावा मिळू शकतो. त्यामुळे एसआयपीमध्ये जोखीम कमी असली तरी ती नाहीच असे होत नाही. (हेही वाचा, Mutual Fund Investment: विदेशी कंपन्यांच्या म्यूचुअल फंड मध्ये गुंतवणूक करावी काय? घ्या जाणून)

दरम्यान, दीर्घ कालावधीत गुंतवणूक करून, एखादी व्यक्ती अशी जोखीम टाळू शकते तर त्यासाठी आवर्ती ठेवी हा गुंतवणुकीसाठी सर्वात सुरक्षित पर्यायांपैकी एक आहे. व्यावहारिकदृष्ट्या, यात कोणताही धोका नाही. आणि हा पर्याय आहे तो म्हणजे पोस्टातील आरडी.

पोस्टातील गुंतवणूक आणि परतावा

पोस्टात पाच वर्षांसाठी समजा तुम्ही प्रति महिना जर 5000 रुपयांची गुंतवणूक केली तर पोस्टाच्या ऑफिस आरडी कॅल्क्युलेटर (मासिक चक्रवाढ वारंवारतासह) नुसार परतावा मिळतो. हा परतावा 5000 रुपयांच्या प्रति महिना पाच वर्षांच्या गुंतवणुकीवर रु. 48,740 असेल. त्यामुळे तुम्हाला पाच वर्षांनंतर एकूण 3,48,740 रुपये मिळतील. महत्त्वाचे म्हणजे हा परतावा निश्चित असेल. त्यात अपवाद वगळता फारसा फरक आढळणार नाही.