Image For Representations (Photo Credits: Twitter/File)

कोविड 19 संकटाने अनेक गोष्टी आपल्याला शिकवल्या आहेत. त्यामधील एक महत्त्वाची बाब म्हणजे जीवनाचा कोणताच भरोसा नाही. अनेकजण आता विमा, दुर्घटना विमा याबाबत सजग झाले आहेत. आपल्या पश्चात कुटुंबाची आर्थिक घडी थोड्या प्रमाणात तरी व्यवस्थित रहावी म्हणून काही जण विमा उतरवून घेतात. अनेकजण दुर्घटना विमा देखील उतरवतात.

विमा उतरवताना तुम्हांला हयात असताना काही विशिष्ट रूपयांची गुंतवणूक करतात. पण ही गुंतवणूक प्रत्येकासाठी शक्य असतेच असे नाही. आर्थिकदृष्ट्या कमजोर असलेल्या व्यक्ती भारत सरकारच्या 'प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना' याचा लाभ घेऊ शकतात. 2015 साली सुरू करण्यात आलेली  Pradhanmantri Suraksha Bima Yojana ही दुर्घटना झाल्यास 2 लाखांची मदत देऊ शकते. यामध्ये व्यक्तीला वर्षाला केवळ 20 रूपये प्रिमियम द्यावा लागणार आहे.

कोणाला मिळू शकतो हा फायदा?

PMSBY चा उद्देश हा भारतातील मोठ्या वर्गाला सुरक्षा विमा देणं हा आहे. पूर्वी याचा प्रिमियम 12 रूपये होता. 1 जून 2022 मध्ये तो वाढवून 20 रूपये करण्यात आला आहे. ही अशी रक्कम आहे जी गरीब व्यक्ती देखील भरू शकते. दुर्घटनेनंतर व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर ती रक्कम नॉमिनी ला दिली जाते. जर लाभार्थ्याचं वय 70 वर्ष आणि अधिक असेल तर प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना टर्मिनेट केली जाते. प्रत्येकवर्षी विमा ची रक्कम 1 जून च्या पूर्वी अकाऊंट मधून कापली जाते.

2 लाखांचा लाभ कधी मिळू शकेल?

जर एखाद्या व्यक्तिचा मृत्यू या स्किमचा फायदा घेत असताना झाला तर नॉमिनीला 2 लाख मिळतात. तसेच जर व्यक्ती विकलांग असेल ज्यामध्ये डोळ्यांनी पाहू शाकत नाही, हात-पाय गमावणं अशि स्थिती असेल तर 2 लाखांची मदत मिळू शकते. जर आंशिक विकलांगता आली असल्यास 1 लाखांची मदत मिळू शकेल.

जाणून घ्या नियम व अटी

  • प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना अंतर्गत केवळ वर्षभरासाठी 20 रूपयांचा प्रिमियम आकरला जाणार आहे. दरवर्षी त्याला रिन्यू करावं लागणार आहे.
  • दुर्घटनेमध्ये मृत्यू किंवा विकलंगता आली तर आर्थिक मदत मिळू शकते.
  • लाभार्थी भारतीय असणं आवश्यक आहे आणि त्याचं वय वर्ष 18-70 असणं आवश्यक आहे.
  • संबंधित व्यक्तीकडे सक्रिय सेव्हिंग अकाऊंट असणं गरजेचे आहे. अकाऊंट बंद झाल्यास पॉलिसी देख़ील संपणार आहे.
  • अर्जदाराला पॉलिसी प्रिमियम च्या ऑटो डेबिट साठी एक सहमती पत्र सही करून द्यावं लागणार आहे.