PM Ujjwala Yojana: प्रधानमंत्री उज्जवला योजनेतुन फ्री गॅस सिलेंडर मिळवायची शेवटची संधी; 30 सप्टेंबर पर्यंत कसे कराल बुकिंग?
LPG Cylinder | (Photo Credits: PTI)

Pradhan Mantri Ujjwala Yojana Booking: प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत मोदी सरकार मोफत गॅस सिलिंडर देत होते. पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या सहकार्याने राबविल्या जाणा‍‍‍र्‍या या योजनेचे विशेष लक्ष महिलांना होणारा त्रास कमी करणे होता. 2016 मध्ये तीन वर्षांंसाठी सुरु झालेली ही योजना यंंदा एप्रिल मध्ये संपणार होती. मात्र लॉकडाउन (Lockdown) मुळे या योजनेचा एप्रिल मध्ये संंपणारा कालावधी संपवुन सप्टेंबर पर्यंत मुदत देण्यात आली होती, आता या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी बुकिंंग करण्याचे काही शेवटचे दिवस बाकी आहेत, प्राप्त माहितीनुसार हे बुकींंग केवळ 31 सप्टेंबर पर्यंत करता येणार आहे.बुकिंग कसे करावे आणि त्यासाठी काय काय कागदपत्रंं आवश्यक आहेत याची सविस्तर माहिती खाली जाणुन घ्या..

LPG Gas Cylinder Cashback Offer: घरगुती गॅस सिलेंडर बुकिंगवर मिळू शकतो 50 रूपये कॅशबॅक; जाणून घ्या Amazon Pay Offer!

प्रधान मंंत्री उज्जवला योजनेच्या अंतर्गत दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांंना मदतीचा हात दिला जात आहे. जर का आपणही दारिद्र्यरेषेखाली येत असाल आणि या योजनेत अजुनही बुकिंंग केलेले नसेल तर त्यासाठी जवळच्या LPG केंद्रात मदत मिळवु शकाल. आपल्याला या केंद्रात जाऊन तिथे केवायसी फॉर्म भरायचा आहे. फॉर्म मध्ये नाव, पत्ता, जन धन बँक खाते क्रमांक, आधार क्रमांक इत्यादी माहिती अचुक भरा. कुटुंबातील महिला सदस्य यासाठी अर्ज करू शकतात.

Pradhan Mantri Ujjwala Yojana Booking साठी ही कागदपत्र आवश्यक:

-पासपोर्ट आकाराचा फोटो,

-बीपीएल कार्ड (दारिद्र्य रेषेखाली असल्याचा पुरावा)

-आधार कार्ड

-वयाचा दाखला,

- बीपीएल यादीतील नाव प्रिंट

- बँकेच्या पासबुकची फोटो कॉपी

-रेशन कार्डाची फोटोकॉपी

दरम्यान, 2016 मध्ये ही योजना सुरु करताना 8 कोटी कुटुंंबाना सिलेंंडरच्या वाटपाचे टार्गेट ठेवण्यात आले होते जे की आधीच पुर्ण करण्यात आले होते. 2011 च्या जनगणनेअंतर्गत दारिद्र्य रेषेखाली येणार्‍या कुटुंंबाना महिन्याकाठी एका सिलेंंडर फ्री मिळण्याची तरतुद या योजनेत आहे.