LPG Gas Cylinder Cashback Offer:  घरगुती गॅस सिलेंडर बुकिंगवर मिळू शकतो 50 रूपये कॅशबॅक; जाणून घ्या Amazon Pay Offer!
LPG (Photo Credits: All India Radio News, Facebook)

सध्या कोरोना व्हायरस लॉकडाऊनमुळे महागाई वाढत असल्याने अनेक गृहिणींचं आर्थिक गणित बिघडलं आहे. अशामध्ये लहान-लहान बचत करूनच पुन्हा घराचं बजेट देखील सुरळीत करण्याचे अनेक जणी प्रयत्न करत आहे. दरम्यान आजकाल ऑनलाईन माध्यमातून गॅस बुकिंग करण्यासाठी अनेक प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत. अवघ्या एका क्लिकवर गॅस बूक करता येऊ शकतो. अगदी मिस्ड कॉलवर देखील एलपीजी गॅस सिलेंडर बूक करण्याची सोय आहे. मग आता ऑनलाईन गॅस बुकिंग सोबतच 50 रूपयांचा कॅश बॅक देखील दिला जात आहे.

अमेझॉन पे च्या माध्यमातून एलपीजी गॅस सिलेंडर्सचं बुकिंग केले तर तुम्हांला 50 रूपये कॅशबॅक मिळू शकतो. अमेझॉन पे वर ही कॅशबॅक ऑफर इण्डेन गॅस, भारत गॅस आणि एचपी गॅस कंपनींना सिलेंडर बुकिंगवर ही ऑफर देण्यात आली आहे.

कॅशबॅक ऑफर घ्यायची असेल तर तुम्हांला अमेझॉन अ‍ॅपच्या पेमेंट ऑप्शनवर जावं लागेल. त्यानंतर गॅस सर्विस प्रोव्हायडर निवडावा लागेल. तेथे तुम्हांला रजिस्टर मोबाईल नंबर, एलपीजी नंबर समाविष्ट करण्याचा पर्याय मिळेल. मात्र यासाठी तुम्हांला अमेझॉन पेच्या माध्यमातून पेमेंट करावं लागणार आहे.

अमेझॉनची ही 50 रूपये कॅशबॅक ऑफर 31 ऑगस्ट पर्यंत मर्यादित आहे. गॅस सिलेंडर बूक झाल्यानंतरतो तुमच्या घरी डिलिव्हर केला जाणार आहे. दरम्यान तुम्ही घरगुती गॅस सिलेंडर उमंग अ‍ॅपच्या माध्यमातूनही बूक करू शकता. त्यावर तुम्हांला भारत, इंडेन आणि एचपी सह अन्य कंपनीचे देखील गॅस सिलेंडर बूक करण्याची सोय आहे.