पेट्रोल, डिझेल दर ( Petrol Diesel Price) वाढ सर्वसामान्य जनतेची नेहमीच डोकेदुखी ठरत असते. आंतरराष्ट्रीय बाजारात असलेले कच्चा तेलाचे दर आणि त्यावर प्रक्रिया करुन स्थानिक बाजारात विकले जाणारे शुद्ध तेलाचे दर यात जमीन अस्मानचे अंतर असते. नेहमीच सांगितले जाते की, इंधन दराच्या किमतीत विविध करांचा समावेश असतो. त्यामुळे इंधनाचे दर वाढतात. नेमका हा प्रकार आहे तरी काय? कसे वाढतात तेलाचे दर? या दरांमध्ये कराचा (Taxes On Petrol Diesel) किती समावेश असतो? पेट्रोल डिझेल दरात किती टॅक्स असतो?
देशाची राजधानी दिल्ली शहरात आज (बुधवार, 1 जुलै) पेट्रोल 80.43 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 80.53 रुपये प्रति लीटर आहे. मात्र, दोन्ही इंधनांचा मूळ दर पाहिला तर तो अनुक्रमे 24.92 आणि 27.03 रुपये प्रति लीटर इतका आहे. दिल्ली मध्ये 24.92 रुपये मूळ किंमत (बेस प्राइज) असलेले पेट्रोल 80.43 रुपये आणि डीजेल 27.03 रुपये असताना 80.53 रुपये प्रति लीटर गेलेच कसे? जाणून घेण्यासाठी इंडियन ऑयल संकेतस्थळावर नजर टाकल्यावर दरांबाबत बरेच काही ध्यानात येते. जे दर 1 जुलै पासून लागू झाले आहेत.
पेट्रोल बेस प्राइज 24.92 रुपये प्रति लीटर आहे. ज्यावर 33 पैसे प्रति लीटर दराने भाडे दिल्यानंतर त्याची किंमत 25.25 रुपये प्रति लीटर होते. त्यावर एक्साइज ड्युटी 32.98 रुपये प्रति लीटर, डीलरचे कमीशन 3.64 रुपये प्रतिल लीटर आणि मूल्यवर्धित कर म्हणजेच व्हॅट 18.56 रुपये प्रति लीटर असे लागते. त्यामुळे सर्वांचे मीळून होतात 80.43 रुपये. जो दर प्रत्यक्षात ग्राहकालाच द्यावे लागतात. (हेही वाचा, LPG Gas Cylinder Price: विना अनुदानित एलपीजी गॅस सिलिंडर दरात किरकोळ वाढ; 1 जुलैपासून भाववाढ लागू)
पेट्रोल प्रमाणेच डिझेल दराचेही असेच आहे. डिझेलची बस प्राइज 27.03 रुपये प्रति लीटर. ज्यावर 30 पैसे प्रति लीटर भाडे द्यावे लागते. त्यामुळे त्याचा दर होते 27.33 रुपये. त्यावर पुन्हा एक्साइज ड्युटी 31.83 रुपये प्रति लीटर, डीलरचे कमिशन 2.54 रुपये प्रति लीटर, मूल्यवर्धित कर (व्हॅट) 18.83 रुपये प्रति लीटर त्यामुळे या सर्वांचे मिळून होता प्रति लीटर 80.53 रुपये. जे ग्राहकाला भरावे लागतात.
देशातील सर्व राज्यांमध्ये विकलेल्या जाणाऱ्या इंधनाचे दर थोड्या अधिक प्रमाणात अशाच प्रकारे वाढतात. ज्याचा थेट बोजा हा सर्वसामान्य जनतेच्या खिशावर पडतो. ज्यामुळे महागाई वाढते आणि सर्वसामान्यांचा त्रासही.