पेन्शनधारकांना आता Life Certificate घरबसल्या देखील मिळणार; जाणून घ्या 31 डिसेंबरपूर्वी या सुविधेचा लाभ घेण्यासाठी शुल्क किती, आवश्यक कागदपत्रं कोणती?
प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-File Image)

नोव्हेंबर महिना आला की पेन्शनधारकांची लाईफ सर्टिफिकेट्ससाठी धावपळ सुरू होते. दरम्यान यंदा कोरोना वायरसचं सावट पाहता लोकांना सुरक्षितततेच्या दृष्टीने नियमांमध्ये काही बदल करण्यात आले आहे. The Ministry of Personnel, Public Grievances & Pensions कडून काही दिवसांपूर्वीच पोस्टमनच्या मदतीने Digital Life Certificate सादर करण्याची सशुल्क सेवा करण्यात आली आहे. त्यामुळे हा लाखो सरकारी पेन्शनधारकांसाठी मोठा दिलासा आहे. सरकारी पेन्शन धारकांनो! आता घरबसल्या jeevanpramaan.gov.in वर सादर करू शकाल Digital Life Certificate.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोव्हेंबर 2014 मध्ये जीवन प्रमाण पोर्ट्ल लॉन्च केले होते. याच्या माध्यमातून लाईफ सर्टिफिकेट ऑनलाईन सादर करण्याची सुविधा देण्यात आली होती. तसेच ही प्रकिया अधिक सुलभ आणि पारदर्शी करण्याचा सरकारचा प्रयत्न होता. आता DoPPW ने भारतीय पोस्ट खात्याची मदत घेत ग्रामीण डाक सेवक आणि पोस्टमॅनच्या मदतीने ही सेवा घरबसल्या उपलब्ध करून देण्यास सुरूवात केली आहे. यासाठी पेन्शनधारकांना 70 रूपये मोजावे लागणार आहेत.

आवश्यक कागदपत्रं कोणती?

पोस्टमन घरी येऊन तुमच्याकडून बायोमॅट्रिकने ही लाईफ सर्टिफेट्स सादर करण्याची प्रक्रिया पूर्ण करणार आहेत. दरम्यान लाईफ सर्टिफिकेटसाठी आधार कार्ड आवश्यक आहे. पेन्शनधारकांकडे आधार क्रमांक असणं बंधनकारक आहे. सोबतच पीपीओ नंबर, मोबाईल नंबर पोस्टात द्यावा लागेल. पोस्टमन आधारच्या माध्यमातूनच डिजिटल लाईफ सर्टिफिकेट देऊ शकेल आणि त्यानंतर ते पेन्शन जारी करणाऱ्या संबंधित विभाग किंवा बँकेत अपडेट होणार आहे.

एरवी तुम्हांला 30 नोव्हेंबर पर्यंतच लाईद सर्टिफिकेट सादरा करण्यासाठी वेळ असतो. ते सादर न झाल्यास तुमची पेन्शन रोखली जाते. परंतू आता कोविड संकट पाहता केंद्र सरकारने लाईफ सर्टिफिकेट जमा करण्याची अंतिम मुदत 31 डिसेंबर 2020 पर्यंत वाढवली आहे. ऑनलाईन jeevanpramaan.gov.in या वेबसाईटवरही डिजिटली लाईफ सर्टिफिकेट जमा करता येणार आहे.