सरकारी पेन्शन धारकांनो! आता घरबसल्या jeevanpramaan.gov.in वर सादर करू शकाल Digital Life Certificate
Digital Life Certificate (Photo Credits: Pixabay)

जर तुम्ही सरकारी पेन्शनधारक (Government Pensioners) असाल तर तुमच्यासाठी नोव्हेंबर हा महिना तुमच्यासाठी फार महत्त्वाचा आहे. दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात बॅंक, पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन तुम्हांला लाईफ सर्टिफिकेट (Life Certificate) म्हनजेच हयातीचा दाखला सादर करावा लागतो. निवृत्तीनंतर कर्मचार्‍यांना, पतीच्या निधनानंतर त्यांच्या पत्नीला आणि 25 वर्षा पर्यंत त्यांच्या मुलांना दरमहा विशिष्ट पेन्शन मिळते. प्रामुख्याने यामध्ये वयोवृद्धांचा समावेश असतो. अनेकदा वयोमानानुसार, आजारपणामुळे दूर बॅंक, पोस्ट ऑफिसमध्ये खेटे मारणं त्रासदायक ठरतं. त्यामुळे हा त्रास लक्षात घेता आता सरकारने ऑनलाईन माध्यमातून लाईफ सर्टिफिकेट सादर करण्याची सोय दिली आहे.

वर्षभर पेन्शन मिळावी म्हणून दरवर्षी 30 नोव्हेंबर पर्यंत लाईफ सर्टिफिकेट सादर करणं गरजेचे आहे. ऑनलाईन माध्यमातून लाईफ सर्टिफिकेट सादर करण्यासाठी Jeevan Pramaan ही सेवा सुरू केली आहे. त्यावर आता Jeevan Pramaan आयडी बनवून jeevanpramaan.gov.in या वेबसाईटच्या माध्यमातून घरबसल्या तुमचा हयातीचा दाखला सादर करता येऊ शकतो.

Digital Life Certificate कसं सादर कराल?

ऑनलाईन सर्टिफिकेट सादर करण्यासाठी तुम्हांला सर्वात आधी Jeevan Pramaan app तुमच्या स्मार्टफोनवर डाऊनलोड करणं आवश्यक आहे. त्यानंतर आयडी बनवण्यासाठी पहा तुम्ही काय कराल?

1) तुमच्या फोनमध्ये Jeevan Pramaan app ओपन करा.

2)न्यू रजिस्ट्रेशनचा पर्याय ओपन करा.

3) आवश्यक माहिती भरा. यामध्ये आधार नंबर, पेन्शन पेमेंट ऑर्डर, बॅंक अकाऊंट, बॅंकेचे नाव, मोबाईल नंबर इत्यादी माहिती भरणं आवश्यक आहे.

4) त्यानंतर तुम्ही दिलेल्या मोबाईल नंबरवर एक ओटीपी पाठवला जाईल.

5)या ओटीपीद्वारा तुम्हांला पुढे आयडी बनवण्यास परवानगी दिली जाईल.

6) बायोमॅट्रिक व्हेरिफिकेशनद्वारा तुमचे डिटेल्स तपासून पहा.

7)यानंतर सबमीट वर क्लिक करा. त्यानंतर तुमची माहिती UIDAI कडून पडताळून घेतली जाईल. त्यानंतर तुमचा Pramaan ID तयार होईल.

सरकारी पेन्शन धारक Pramaan ID च्या मदतीने ऑनलाईन लाईफ सर्टिफिकेट सादर करू शकतात. यासाठी jeevanpramaan.gov.in वर तुम्हांला ही सोय मिळू शकते.

1)Jeevan Pramaan app वर लॉगिन करून Pramaan ID आणि OTP एंटर करा.

2)Generate Jeevan Pramaan option निवडा.

3)त्यानंतर आधार कार्ड क्रमांक आणि मोबाईल क्रमांक एंटर करून Click on Generate OTP निवडा.

4) तुमच्या रजिस्टर मोबाईलवर ओटीपी येईल. त्यानंतर तो एंटर करा.

5) यानंतर तुम्हांला PPO Number, नाव, disbursing agency चं नाव विचारलं जाईल.

6) त्यानंतर no objection option सिलेक्ट करून फिंगरप्रिंट/ iris स्कॅन करा.

7)आधार डाटाच्या माध्यमातून पुन्हा तुमची माहिती तपासली जाईल.

8)Jeevan Pramaan वर तुमची माहिती यशस्वी रित्या अपलोड झाल्यानंतर तसा मेसेज दिसेल.

9) तुमच्या मोबाईल नंबरवर त्याचा कन्फरमेशन मेसेज येईल. सोबतच Jeevan Pramaan Certificate ID दिला जाईल.

Jeevan Pramaan Patra ID बनवणं ही प्रक्रिया केवळ एकदाच करायची आहे. त्याच्या मदतीने दरवर्षी 30 नोव्हेंबर पूर्वी घरबसल्या तुम्ही ऑनलाईन सर्टिफिकेट सादर करू शकता.