Passport Application: नवीन पासपोर्ट काढण्यासाठी कोणती कागदपत्रं आवश्यक? येथे पहा संपूर्ण यादी
पासपोर्ट (Image Credits: PTI)

पासपोर्ट (Passport) काढण्यासाठी तुम्ही दोन पद्धतींचा अवलंब करु शकता. ऑनलाईन (Online) आणि ऑफलाईन (Offline). मात्र पासपोर्ट काढण्यासाठी तुमच्याकडे आवश्यक कागदपत्रं असणे गरजेचे आहे, ओळखपत्र, रेसिडेंशियल प्रुफ (Residential Proof), डेथ ऑफ बर्थ प्रुफ (Date of Birth Proof) इत्यादी. ही त्यामुळे ऑफलाईन पद्धतीने तुम्ही पासपोर्ट काढणार असला तर पासपोर्ट सेवा केंद्रावर जाताना ही आवश्यक कागदपत्रं सोबत बाळगणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे पासपोर्ट काढण्यासाठी नेमकी कोणती कागदपत्रं लागतात, याची माहिती आपण घेऊया...

अॅड्रेस प्रुफ: जेव्हा तुम्ही फ्रेश पासपोर्टसाठी अप्लाय कराल तेव्हा तुम्हाला तुमचा रेडिडेंशियल अॅड्रेल असलेली कागदपत्रं सादर करणे आवश्यक आहे. खालीलपैकी कोणतंही कागदपत्रं अॅड्रेस प्रुफ म्हणून वापरता येईल.

# पाणी बिल

# टेलिफोन बिल (लँडलाईन किंवा पोस्टपेड मोबाईल बिल)

# विज बिल

# इन्कम टॅक्स ऑर्डर

# इलेक्शन कार्ड

# गॅस कनेक्शन कार्डजोडीदाराचा पारपोर्ट (पहिलं आणि शेवटंच पान)

# लहान मुलांच्या पासपोर्टसाठी पालकांचा पासपोर्ट (पहिलं आणि शेवटंच पान)

# आधार कार्ड

# घरभाडे करार

# बँक अकाऊंट पासबुक

# काम करत असलेल्या कंपनीकडून सर्टिफिकेट

# डेट ऑफ बर्थ प्रुफ

डेथ ऑफ बर्थ प्रुफ: पासपोर्ट काढणाना आवश्यक असणारं अजून एक महत्त्वाचं कागदपत्रं म्हणजे डेथ ऑफ बर्थ प्रुफ. यापैकी कोणतेही कागदपत्रं तुम्ही डेथ ऑफ बर्थ प्रुफ म्हणून वापरु शकता.

# नगरपालिका किंवा रजिस्ट्रार कडून मिळालेला जन्मदाखला.

# शाळा सोडल्याचा किंवा शाळा बदली केल्याचा दाखला.

# जन्म दिनांक नमूद केलेले लाईफ इन्शोरन्स कॉर्पोरेशनचे कागदपत्रं.

# सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सर्व्हिस रेकॉर्डची कॉपी.

# आधारकार्ड/ई-आधार.

# इलेक्शन फोटो आयटेंडिट कार्ड.

# पॅन कार्ड.

# ड्रॉयव्हिंग लायसन्स.

# अनाथ असल्यास अनाथलायाकडून जन्म दिनांक नमूद केलेले कागदपत्रं.

या कागदपत्रांच्या मदतीने तुम्ही पासपोर्ट काढू शकता. दरम्यान, पासपोर्ट कसा काढायचा, त्याची पद्धत कोणती, कशी याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.