भारतीय लष्कराची सतर्कता पाहून पाकिस्तानी विमानांनी काढला पळ
File photo for representation only

पाकिस्तानी लष्कराची लढाऊ विमानांनी भारतीय हद्दीत प्रवेश केला. मात्र, 24 तास सतर्क असलेल्या भारतीय लष्कराची सतर्कता पाहून पाकिस्तानी विमानांनी काही क्षणातच पळ काढला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी विमान आणखी काही सेकंद जरी भारतीय हद्दीत थांबले असते तर, ते विमान पाकिस्तानला परत मिळण्याची सूतराम शक्यता नव्हती. भारतीय लष्कराने हे विमान जागीच पाडले असते.

भारतीय लष्कराने पाकिस्तानी विमानानांना यशस्वीरित्या पिटाळून लावले आहे. दरम्यान, भारतीय लष्कर किंवा भारत सरकारने अद्याप या वृत्ताला दुजोरा दिला नाही. मात्र, सूत्रांच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, पाकिस्तानची एकूण 3 विमाने भारतीय हद्दीत आली होती. (हेही वाचा, Surgical Strike 2: भारतीय सैन्याकडून पाकिस्तान लष्कराच्या 5 चौक्या उद्ध्वस्त)

दरम्यान, पुढील तीन तासांसाठी श्रीनगर विमानतळ  उड्डाणासाठी बंद करण्यात आले आहे. तसेच, पूंछ, राजौरी आदी भागात पाकिस्तानने बॉम्ब टाकल्याचे समजते आहे. मात्र, याला कोणताही दुजोरा मिळू शकला नाही.

महत्त्वाची टीप: भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर प्रकाशित केलेले वृत्त लेटेस्टलीकडे प्राप्त झालेल्या माहितीवर आधारीत आहे. कोणत्याही निष्कर्षावर पोहचण्यापूर्वी किंवा सोशल मीडियावर संदेश प्रसारित करण्यापूर्वी वाचकांनी भारतीय लष्कराकडून अधिकृत माहिती मिळेपर्यंत प्रतिक्षा करावी अशी विनंती.