जर तुम्ही 31 मार्च पूर्वी पॅन कार्डसोबत (PAN) आधार कार्ड (Aadhaar Card) लिंक करू शकला नाहीत तर तुम्हांला दोन गोष्टींचा सामना करावा करणार आहे. एक म्हणजे तुमचं पॅन कार्ड इन अॅक्टिव्ह होणार आहे तर दुसरं म्हणजे तुम्हांला 10,000 रूपयांपर्यंतचा दंड होऊ शकतो. याबाबत इन्कम टॅक्स विभागाकडून नुकतेच एक नोटिफिकेशन जारी करण्यात आले आहे. दरम्यान नव्या नोटिफिकेशननुसार इन्व्हॅलिड पॅन कार्ड वापरताना एखादी व्यक्ती आढळल्यास Income Tax Actच्या Section 272B अंतर्गत संबंधित व्यक्तीला 10,000 रूपयांपर्यतचा दंड आकारला जाऊ शकतो. 31 मार्च 2020 पर्यंत पॅनकार्ड आधारकार्डशी लिंक न केल्यास होणार रद्द, आयकर विभागाचा 17 कोटी नागरिकांना इशारा
पॅनकार्ड- आधार कार्डासोबत लिंक कसे कराल?
1. सर्वात अगोदर आयकर विभागाची अधिकृत वेबसाईट incometaxindiaefiling.gov.in वर जावं लागेल.
2. वेबसाईटवर आल्यानंतर डाव्या बाजूला आधार कार्डशी लिंक करण्याचा पर्याय दिसेल.
3. त्यानंतर नवीन पेज ओपन होईल. या नव्या पेजवर लाल रंगात Click here असं लिहिलं असेल.
4. तुम्ही याअगोदर पॅन कार्ड आधार कार्डसोबत लिंक केलं असेल तर या पेजवर क्लिक करुन तुम्ही त्याची पडताळणी करु शकतात.
5. तुम्ही लिंक केलं नसेल तर Click here च्या खाली बॉक्समध्ये पॅन नंबर, आधार नंबर आणि नाव विचारलं असेल. ते सर्व पर्याय भरायचे.
6. त्यानंतर Link Aadhar या पर्यायावर क्लिक करायचे. या क्लिकसोबतच पॅन कार्डला आधार कार्डसोबत लिंक करण्याची प्रक्रिया पूर्ण होईल.
( नक्की वाचा: Aadhaar-PAN Linking: SMS आणि Login शिवाय अशा पद्धतीने करा आधार-पॅन कार्डला लिंक.)
पॅन कार्डला आधार कार्डसोबत लिंक करण्यासाठी केंद्र सरकारने याअगोदर पुरेशी मुदतवाढ दिली आहे. मात्र, अजूनही देशातील सुमारे 17 कोटीहून अधिक नागरिकांनी आपलं पॅन कार्ड आधार कार्डसोबत लिंक केलेलं नाही त्यामुळे अशा लोकांसाठी 31 मार्च 2020 ही अंतिम मुदत असेल.