31 मार्च 2020 पर्यंत पॅनकार्ड आधारकार्डशी लिंक न केल्यास होणार रद्द, आयकर विभागाचा 17 कोटी नागरिकांना इशारा

पॅन कार्डला आधार कार्डसोबत लिंक करण्यासाठी केंद्र सरकारने याअगोदर अनेकवेळा मुदतवाढ दिली आहे. मात्र, अजूनही देशातील 17 कोटी नागरिकांनी आपलं पॅन कार्ड आधार कार्डसोबत लिंक केलेलं नाही. त्यामुळे येत्या 31 मार्च 2020 पर्यंत या नागरिकांनी पॅन कार्ड आधार कार्डसोबत लिंक केलं नाही तर त्यांचे पॅन कार्ड रद्द होणार आहे.

31 मार्च 2020 पर्यंत पॅनकार्ड आधारकार्डशी लिंक न केल्यास होणार रद्द, आयकर विभागाचा 17 कोटी नागरिकांना इशारा
PAN Card-Aadhar Card Link (File Photo)

पॅन कार्ड (Pan Card) आधार कार्डशी (Aadhar Card) लिंक करा अशा सूचना वारंवार सरकारकडून येत आहेत. मात्र अजूनही ब-याच लोकांनी अजूनही आधारकार्ड लिंक केलेले नाही. अशा लोकांसाठी ही शेवटची संधी! येत्या 31 मार्च 2020 पर्यंत कार्डला आधार कार्डसोबत लिंक केलं नाही तर 17 कोटी नागरिकांचे पॅन कार्ड रद्द होईल, असा निर्वाणीचा इशारा केंद्रीय प्रत्यक्ष आयकर विभागाने (सीबीडीटी) दिला आहे. ही त्या लोकांसाठी धोक्याची घंटा असेल ज्यांनी अजूनही आपले पॅनकार्ड आधारकार्डला लिंक केलेल नाही.

पॅन कार्डला आधार कार्डसोबत लिंक करण्यासाठी केंद्र सरकारने याअगोदर अनेकवेळा मुदतवाढ दिली आहे. मात्र, अजूनही देशातील 17 कोटी नागरिकांनी आपलं पॅन कार्ड आधार कार्डसोबत लिंक केलेलं नाही. त्यामुळे येत्या 31 मार्च 2020 पर्यंत या नागरिकांनी पॅन कार्ड आधार कार्डसोबत लिंक केलं नाही तर त्यांचे पॅन कार्ड रद्द होणार आहे.

सीबीडीटीने दिलेल्या माहितीनुसार, 27 जानेवारी 2020 पर्यंत 30.75 कोटी पॅन कार्ड आधार कार्डसोबत लिंक करण्यात आले आहेत. मात्र, तरीही अजून 17.58 कोटी पॅन कार्ड आधार कार्डसोबत लिंक करण्यात आलेले नाहीत.

कसं कराल पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक?

1. सर्वात अगोदर आयकर विभागाची अधिकृत वेबसाईट incometaxindiaefiling.gov.in वर जावं लागेल. Aadhar Card New Rule: आय-टी रिटर्न भरताना चुकीचा आधार तपशील दिल्यास होणार 10,000 रुपयांचा दंड

2. वेबसाईटवर आल्यानंतर डाव्या बाजूला आधार कार्डशी लिंक करण्याचा पर्याय दिसेल.

3. त्यानंतर नवीन पेज ओपन होईल. या नव्या पेजवर लाल रंगात Click here असं लिहिलं असेल.

4. तुम्ही याअगोदर पॅन कार्ड आधार कार्डसोबत लिंक केलं असेल तर या पेजवर क्लिक करुन तुम्ही त्याची पडताळणी करु शकतात.

5. तुम्ही लिंक केलं नसेल तर Click here च्या खाली बॉक्समध्ये पॅन नंबर, आधार नंबर आणि नाव विचारलं असेल. ते सर्व पर्याय भरायचे.

6. त्यानंतर Link Aadhar या पर्यायावर क्लिक करायचे. या क्लिकसोबतच पॅन कार्डला आधार कार्डसोबत लिंक करण्याची प्रक्रिया पूर्ण होईल.

31 मार्च ला अजून महिना जरी असला तरीही लवकरात लवकर आपले पॅन कार्ड आधारकार्डशी लिंक करा आणि देशाचा एक जबाबदार नागरिक म्हणून आपले योगदान द्या असे सरकारकडून सांगण्यात येत आहे.

(The above story first appeared on LatestLY on Feb 15, 2020 03:12 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).