Aadhaar-PAN Linking: SMS आणि Login शिवाय अशा पद्धतीने करा आधार-पॅन कार्डला लिंक
पॅन कार्ड (Photo Credits: File Photo)

सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) आधार कार्ड (Aadhar Card) पॅन कार्डसोबत (PAN Card) लिंक करणे अनिवार्य असल्याचे आदेश दिले होते.त्यामुळेच 31 मार्च ही लिंक करण्याची अंतिम तारीख ठरवली गेली आहे. तसेच आधार कार्ड पॅन कार्डसोबत लिंक न केल्यास इनकम टॅक्स रिर्टन भरण्याबाबत अडथळा येण्याची शक्यता आहे. म्हणून आधार कार्ड पॅन कार्ड सोबत लिंक केल्यानंतर तुम्हाला टॉक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया पुढे सुरु होणार आहे. परंतु जर अद्याप तुम्ही आधार पॅनला लिंक केले नसेल तर ते त्वरीत लिंक करुन घ्या. तसेच मेसेज आणि लॉगिन न करता या पद्धतीने तुम्ही आधार-पॅन कार्डसोबत लिंक करता येणे शक्य होणार आहे.

लिंक करण्यासाठी तुम्हाला इनकम टॅक्स विभागाचे संकेतस्थळावर जायचे आहे. त्यामुळे लॉगिनशिवाय फक्त दोन टप्प्यात तुमचे आधार-पॅन कार्डसोबत लिंक करणे सोपे होणार आहे.(हेही वाचा-तुमचे PAN card सांगेल, तुम्हाला Income Tax विभागाची नोटीस येणार की नाही?)

या पद्धतीने तुम्ही आधार-पॅन कार्ड लिंक करु शकता-

-इनकम टॅक्स विभागाच्या संकेतस्थळावर जाऊन तेथे डाव्या बाजूला असलेल्या पॅन-आधार लिंक असे ऑप्शन दिसेल. त्यानंतर या ऑप्शनवर क्लिक केल्यास एक नवीन विंडो सुरु होईल. तेथे तुम्हाला तुमचा आधार कार्ड आणि पॅन कार्डवरील माहिती योग्य भरावयाची आहे.

-लक्षात ठेवा नावाच्या स्पेलिंगमध्ये चुक करु नका. त्यानंतर तुम्हाला एक कॅप्चा कोड भरायचा आहे. तसेच कोड भरल्यानंतर लिंक या ऑप्शनवर क्लिक करा. त्यामुळे तुम्हाला आधार-पॅनला लिंक करण्याबाबत सर्व माहिती उपलब्ध होणार आहे.

-तसेच मेसेजच्या माध्यमातून तुम्ही आधार-पॅनला लिंक करु शकता. त्यासाठी तुम्हाला SMS to 567678 किंवा 56161 या क्रमांकावर मेसेज पाठवू शकता.

-तुम्हाला प्रथम UIDPAN असे लिहायचे असून 12 अंकी आधार क्रमांक लिहिल्यावर स्पेस देऊन पॅन कार्ड क्रमांक लिहायचा आहे.

- इनकम टॅक्सच्या संकेतस्थळावर तुमचे पहिल्यापासून लॉगिन असल्यास तुम्हाला पोर्टलवर लॉगिन करायचे आहे. त्यानंतर प्रोफाईल सेटिंगमध्ये जाऊन आधार पॅन कार्ड सोबत लिंक करु शकता.

अशा सोप्या पद्धतीने तुम्हाला आधार-पॅन सोबत लिंक करता येणार आहे. परंतु जर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने भरणे कळत नसल्यास तुम्ही पॅन कार्ड सेंटर येथे जाऊन तुम्ही फॉर्म भरु शकणार आहात.