तुमचे PAN card सांगेल, तुम्हाला Income Tax विभागाची नोटीस येणार की नाही?
How to check income tax return status | (Photo credit: archived, edited, representative image)

How to check income tax return status: आर्थिक वर्ष 2018/19 मध्ये तुम्ही जर आपला कर गुंतवणूक पुरावा (Tax Investment Proof) जमा केला नसेल तर तो 31 मार्चपूर्वीच जमा करा. अन्यथा, तुमच्या वार्षिक उत्पन्नातून तो कर कापला जाईल. गेल्या आर्थिक वर्षांतही ज्यांनी टॅक्स रिटर्न फाईल (Tax Return File) केली नसेल त्या मंडळींनीही वेळीच सावध व्हा. दरम्यान, ज्या मंडळींनी टॅक्स रिटर्न फाईल केली नाही त्यापैकी बहुतांश मंडळींना भीती वाटते आहे की, त्यांना आयकर विभागागडून नोटीस येईल. आयकर विभाग टॅक्स रिटर्न फाईल न करणाऱ्या मंडळींची स्क्रूटनी करतो आणि त्यानंतर त्या मंडळींना नोटीस पाठवतो. दरम्यान, आयकर विभागाचे नोटीस तुम्हाला नोटीस पाटवणार किंवा नाही याबाबत तुम्ही तुमच्या पॅन कार्डच्या (Permanent Account Number) अधारेही माहिती घेऊ शकता.

आयकर विभागाचे असते बारीक लक्ष

पॅन (Permanent Account Number) कार्ड आपल्याला आपल्या टॅक्सबाबत माहिती देते. केंद्र सरकारही आपल्या PAN (Permanent Account Number) वरुनच काही मिनिटांतच आपले प्रोफाईल तपासून तुम्ही इनकम टॅक्स रिटर्न फाईल केली आहे किंवा नाही याबाबत माहिती देते. सरकारचा आयकर विभाग हा नेहमी लक्ष ठेवतो की, तुम्ही करचोरी तर करत नाही ना?

आयकर विभागाची नोटीस येणार की नाही, असे तपासा

आयकर विभागागडून तुम्हाला नोटीस एणार की नाही हे जाऊन घेण्यासाठी https://www.incometaxindia.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या. हे संकेतस्थळ आयकर विभागाचे अधिकृत संकेतस्थळ (बेबसाईट)आहे. इथे तुम्ही जाणून घेऊ शकता की संबंधीत आर्थिक वर्षात तुम्ही दाखल केलेली टॅक्स रिटर्न प्रोसेस पूर्ण झाली आहे किंवा नाही. आयकर विभागाचे संकेतस्थळ अॅक्सेस करण्यासाठी तुमच्याकडे लॉगइन आयडी आणि पासवर्ड असणे आवश्यक आहे. जर तो तुमच्याकडे नसेल तर, तुम्हाला तो तयार करावा लागेल.त्यासाठी तुम्हाला तुमच्या नावाची वेबसाईटवर नोंदणी करावी लागेल. (हेही वाचा, 19 करोड पॅन कार्ड होणार रद्द, 'या' लिस्टमध्ये तुमचे नाव तर नाही ना?)

करपरतावा तपशील असा तपासा

आयकर विभागाच्या संकेतस्थळावर तुम्ही तुमच्या नावावर काही अगोदरचा करही प्रलंबीत (पेंडींग) आहे किंवा नाही हे तपासू शकता. जर तुम्ही रिटर्न फाईल केले आहे आणि तरीही तुमच्या नावासमोर पेंडींग असे दिसत असेल तर, तुम्हाला आयकर विभागाची नोटीस येऊ शकते. जर तुम्ही रिटर्न फाईल केली नसेल तरीही तुम्हाला नोटीस येऊ शकते. या नोटीसमध्ये आपण इनकम टॅक्स रिटर्न का करत नाही असे विचारले जाते.

फॉर्म 26 AS तपासा

दरम्यान, आयकर विभागाच्या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही फॉर्म 26 AS सुद्धा पाहू शकता. या फॉर्ममध्ये आपल्या पॅन (PAN ) वरुन किती कर कापला गेला आहे याची माहिती मिळते. ज्यामुळे तुम्हाल माहिती मिळते की, आतापर्यंत तुम्ही किती कर भरला आहे आणि तुम्हाला आणखी किती कर भरायचा आहे.