बदलत्या काळानुसार कामे करण्याचा मार्ग ही बदलत चालले आहे. सरकारी किंवा कोणत्याही प्रकराच्या सेक्टरमध्ये सर्वत्र तुम्हाला तुमचे महत्वाची कागदपत्रे दाखवावी लागतात. या महत्वाच्या कागदांपैकी एक असे पॅन कार्ड (PAN Card) ही अनिवार्य करण्यात आले आहे. परंतु येत्या काही दिवसात जवळजवळ 20 करोड पॅन कार्ड रद्द होण्याची शक्यता आहे. तर एका रिपोर्ट्सनुसार कोणत्या पॅनकार्डसाठी धोका आहे हे आम्ही सांगत आहोत.
खरंतर, सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार, पॅन कार्ड आधार कार्ड (Aadhar Card) सोबत लिंक करण्यासाठी शेवटची तारीख 31 मार्च ठरविण्यात आली आहे. परंतु केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डचे अध्यक्ष सुशील चंद्रा यांच्या मतानुसार आता पर्यंत फक्त 50 टक्के पॅन कार्ड धारकांनी आपल्या बायोमॅट्रिक ओळख ही पॅन कार्डशी लिंक केले आहे. तसेच आयकर विभागाने आता पर्यंत 42 करोड स्थायी खात्यांची संख्या कमी केली आहे. त्यामुळे 19 करोड पॅन कार्ड असणाऱ्यांना धोका संभवण्याची शक्यता आहे.
तसेच पॅन कार्ड आधार कार्डसोबत लिंक केल्यावर खरे आणि खोट्या पॅन कार्डची माहिती उपलब्ध होणार आहे. मात्र जर पॅन कार्ड आधार कार्डसोबत लिंक न केल्यास ते रद्द होणार आहे. (हेही वाचा-1 एप्रिल पर्यंत पूर्ण करा 'हे' काम, नाहीतर PAN Card होईल निष्क्रिय)
आधार-पॅन कार्ड लिंक करणे कुठे जरुरीचे आहे?
सुप्रीम कोर्टने एका निर्णयानुसार आधार कार्डला पॅन कार्ड सोबत लिंक करणे अनिवार्य केले आहे. जर असे न केल्यास इनकम टॅक्स रिटर्न करु शकणार नाही. असे न केल्यास लिंकिंगमुळे आयटी विभाग टॅक्सवर खर्च करण्याचा मार्ग आणि अन्य माहिती सोप्या रितीने मिळवू शकणार आहे.
अन्य काही कंपन्यानाबाबात ही पॅन कार्ड लिंककरण्याच्या प्रक्रियेबाबात माहिती मिळू शकणार आहे. त्यामुळे समाज कल्याण योजनांचा लाभ लोकांना योग्यरित्या मिळत आहे की नाही हे सुद्धा कळू शकणार आहे. तसेच 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त ट्रांजेक्शन आणि उद्योगधंद्यासाठी पॅन कार्डची आवश्यकता आहे.
जर तुम्ही आता पर्यंत आधार-पॅन लिंकिंग केले नसेल तर, एका मेसेजच्या माध्यमातून लिंक करु शकणार आहात. तसेच आयटी डिपार्टमेंटच्या मतानुसार, 567678 किंवा 56161 या क्रमांकावर एसएमएस पाठवून आधार कार्ड पॅन कार्ड सोबत लिंक करता येणार आहे.