Cash | File Image

Pension Fund Regulatory and Development Authority (PFRDA) कडून या महिन्याच्या सुरूवातीला National Pension Scheme मधून पैसे काढण्याबाबत नवे नियम जारी करण्यात आले आहेत. रिटायरमेंटच्या दृष्टीने अनेकजण आर्थिक गुंतवणूकीचा एक पर्याय म्हणून NPS कडे पहतात. मग आज पहा याद्वारा तुमची रिटायरमेंट तुम्ही कशी आखू शकता?

नुकत्याच झालेल्या एका सर्व्हे मध्ये दाखवण्यात आलेल्या ट्रेंड नुसार अनेक लोकं त्यांची रिटायरमेंट प्लॅनिंग करत आहेत. वस्तुस्थिती अशी आहे की सेवानिवृत्ती निधीची गुंतवणूक निश्चित उत्पन्न गुंतवणुक आणि annuities यांच्यावर अवलंबून असतात. पण प्रत्यक्षात मात्र त्यांचे प्रमाण महागाईला मत देणारं नसतं.त्यामुळे पैशांची तडजोड करावी लागते.

पुरेसा सेवानिवृत्ती निधी मिळविण्यासाठी, व्यक्तींना higher equity exposure घ्यावे लागते. equity exposure हे स्टॉक्स आणि म्युचल फंडच्या माध्यमातून मिळू शकते. अनेकांना नेमक्या कोणत्या फंड मध्ये किंवा स्टॉक मध्ये पैसे गुंतवावे हा प्रश्न पडलेला असतो. याला एक उत्तम पर्याय म्हणून national pension scheme कडे पाहता येऊ शकते. Financial Freedom Tips: कर्जमुक्त जीवन जगण्याचा वेगवान मार्ग, कसे मिळवाल आर्थिक स्वातंत्र्य? जाणून घ्या सात पर्याय .

National Pension Scheme ही वयाच्या 60 व्या वर्षापर्यंत लॉक असते. यामध्ये गुंतवणूकदाराला इक्विटी आणि debt आणि पेन्शन फंड मॅनेजर यांच्यातील वाटप हा एकमेव निर्णय घ्यावा लागतो. इतर रियाटरमेंट इन्व्हेस्टमेंट पाहता active equity option सुचवला जातो.

NPS corpus हा वयाच्या 60 व्या वर्षी काढला जातो. यामध्येही 40% हा annuity मध्ये तर 60% हा वाटा हा टॅक्स फ्री एकरकमी स्वरूपात काढला जातो. सदस्य त्यांच्या गरजेनुसार एकरकमी रक्कम त्यांच्या गरजेनुसार ठेवतात. मुदत ठेवी, ज्येष्ठ नागरिक बचत योजना, पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना इत्यादींसारख्या नियमित परताव्याच्या बहुतेक पर्यायांवरील व्याजावर स्लॅबवर कर आकारला जातो. येथे 2 समस्या होत्या - रिटर्न्स वर कर आणि साठलेले पैसे पुन्हा कुठे ठेवायचे?

NPS मधून पैसे काढण्याच्या नियमात केलेल्या बदलामुळे वरील दोन्ही समस्या सुटणार आहेत. नव्या नियमांनुसार, सदस्य 60% रक्कम ही systematic lump sum withdrawal plan नुसार काढू शकतो. हा पर्याय दरमहा, तीन महिन्यातून एकदा, वर्षातून, सहा महिन्यातून एकदा अशी काढली जाऊ शकते. हे वयाच्या 75 वर्षापर्यंत केले जाऊ शकतं. निवृत्त होताना ते निवडण्याचा पर्याय दिला असेल त्यानुसार ते ठरेल. काढलेली रक्कम टॅक्स फ्री असणार आहे. उरलेल्या रक्कमेवरील रिटर्न देखील टॅक्स फ्री असणार आहेत.

नवीन नियमांमुळे NPS ही भारतातील सर्वोत्तम सेवानिवृत्ती योजना आहे. बहुतेक लोक औपचारिक आर्थिक सल्ला घेत नाहीत आणि निवृत्तीसाठी वरच्या वर पद्धतीने गुंतवणूक करतात. NPS गुंतवणूकदारांना इक्विटीमध्ये गुंतवणूक करण्याची परवानगी देते, काय खरेदी करावे किंवा कधी संतुलित करावे याची चिंता न करता. लॉक-इन कोणतीही अडचण होणार नाही याची खात्री देते, त्यामुळे गुंतवणुकीत वाढ होते. निवृत्तीनंतर, ग्राहकांना annuity portion द्वारे नियमित परतावा मिळतो, जो आवश्यक प्रमाणात SLW सह वाढविला जाऊ शकतो, तर उर्वरित भाग करमुक्त बाजाराशी संबंधित परतावा मिळवणे सुरू ठेवत असते.