Income Tax E-Filing चं नवं Portal 7 जून पासून उपलब्ध होणार; पहा त्याचे काय असतील फीचर्स, फायदे
Income Tax Return File | (Images for symbolic purposes only। Photo Credits: pixabay)

ITR चं नवं ई फाईलिंग पॉर्टल आता 7 जून पासून सुरू होणार आहे. या पोर्टलच्या माध्यमातून आता युजर्सचा अनुभव अधिक चांगला होणार आहे. नवं ई फाईलिंग पोर्टल 2.0 हे मोबाईल फ्रेंडली आहे. तसेच यामुळे आता ई फाईलिंग करण्याची प्रकिया सुकर होणार आहे. नवं पोर्टल लाईव्ह करण्यासाठी आता सध्याचं पोर्टल 6 जून पर्यंत बंदा ठेवण्यात आलं आहे. दरम्यान इन्कम टॅक्स विभागाकडूनही देण्यात आलेल्या माहितीनुसार देखील त्यांनी युजर्सला होत असलेल्या त्रासाची माहिती आहे. पण नवं पोर्टल येत असल्याने सध्या आम्ही कोणतीही अपडेट करु शकत नाही. नक्की वाचा:  ITR 2021 Filing Deadline: करदात्यांना दिलासा; सरकारने वाढवली 2020-21 या आर्थिक वर्षासाठी आयकर विवरणपत्रे सादर करण्याची अंतिम तारीख, जाणून घ्या नवीन डेडलाईन.

टॅक्स पेअर्स यांना तातडीने आयटीआर मध्ये फाईलिंग केल्यानंतर रिफंड मिळावा यासाठी आणि ही प्रक्रिया सुकर करण्यासाठी काही बदल होणार आहेत. दरम्यान मिंट च्या माहितीनुसार, पहा काय असू शकतात फीचर्स.

नव्या ई फाईलिंग पोर्टल्सची फीचर्स

1. नव्या पोर्टलमध्ये युजर्जना टॅक्स फाईल केल्यानंतर त्यांचा रिटर्न कमीत कमी वेळेत मिळण्यासाठी मदत होणार आहे.

2.सिंगल डॅशबोर्ड द्वारा आता इंटरअ‍ॅक्शन, अप्लोड्स आणि पेंडिंग अ‍ॅक्शनची माहिती मिळणार आहे.

3.टॅक्स पेअर्सना आता मोफत आयटीआर प्रिपरेशन सॉफ्टवेअर्स ही ऑनलाईन आणि ऑफलाईन मिळणार आहेत. या सॉफ्टवेअर्स मुळे डाटा एंट्रीचं काम कमी होणार आहे.

4.टॅक्स भरणार्‍यांना आता त्यांच्या मनातील शंकांचं निरसन करण्यासाठी नवं कॉल सेंटर मिळणार आहे.

5.डेस्कटॉप प्रमाणेच आता मोबाईल वर देखील अ‍ॅप च्या माध्यमातून सारी माहिती मिळू शकणार आहे. तसेच ती डेस्कटॉप प्रमाणेच मोबाईलवरही काम करेल.

नव्या पोर्टलमध्ये आता ऑनलाईन ट्रान्झॅक्शन साठी युपीआय, क्रेडीट कार्ड, आरटीजीएस, एनईएफटी, ऑनलाईन बॅंक यांची देखील सेवा आणि पर्याय मिळणार आहे. त्यामुळे नव्या रूपात येणार्‍या इन्कम टॅक्सच्या पोर्टलसाठी युजर्सने थोडा धीर धरावा असं आवाहन करण्यात आलं आहे. नव्या पोर्टल सोबत जुळवून घेण्यासाठी आता करदात्यांनाही सुरूवातीला थोडा वेळ लागू शकतो.