प्रामुख्याने पावसाळ्याच्या दिवसात आणि अधिमधी इतर वेळी आकाशात ढग येणे, विजा चमकणे, ढगांच्या गडगडाटात किंवा गडगडाट न होताही जमीनीवर आकाशातून वीज कोसळणे ( Lightning Facts and Risks) या तशा सामान्यच गोष्टी. पूर्वंपार चालत आलेल्या. असे असले तरी नैसर्गिक असलेली ही बाब अतिशय धोकादायक ठरु शकतं बरं. अनेकदा अशा घटना पुढे येतात वीज कोसळून नागरिक ठार, प्राणी ठार, जखमी, झाडावर वीज पडली वैगेरे वैगेरे. अलिकडे वेगाने होणाऱ्या पर्यावरणीय बदलांमुळे वीज कोसळण्याच्या घटणा मोठ्या प्रमाणावर होताना दिसत आहेत. म्हणूनच जाणून घ्या वीज कोसळून होणारा संभाव्य धोका, दुर्घटना टाळण्यासाठी आपण काय खबरदारी घ्यावी.
वीज का पडते?
आकाशात ढगांची मोठ्या प्रमाणावर दाठी असते. प्रचंड प्रमाणावर वाऱ्याचा दाब आणि उष्णता आदींमुळे वाफेचे ढग एका बाजूहून दुसऱ्या बाजूला ढकलले जातात. परिणामी त्यांच्यात घर्षण होते. आणि मेघगर्जनेसह विजनिर्मिती होते. शास्त्रीय भाषेत सांगायचे तर ढगांच्या तळाशी असलेले नकारात्मक इलेक्ट्रॉन (Negative Electrons) जेव्हा जमीनकडील पॉझिटीव्ह इलेक्ट्रॉन च्या दिशेने झेपावतात किंवा आकर्षिक होतात तव्हा निर्माण होणाऱ्या प्रक्रियेतून विजनिर्मिती होते.
वीज कोसळण्याची शक्यता असल्यास काय करावे
- सर्वसाधारणपणे पावसाळ्यात वजी कोसळते हे सर्वांनाच माहिती आहे. त्यामुळे आकाशात ढग असतील आणि धोकादायक वातावरण असल्यास शक्यतो घराबाहेर पडणे टाळावे.
- नेहमी सुरक्षीत प्रवासाचा मार्ग अवलंबा. आकाशात ढग गडगडत असतील, काळोख दाटून आला असेल तर शक्यतो घराबाहेर पडणे टाळा. शक्यतो आपले काम पुढे ढकला.
- समजा जर काम अतिमहत्त्वाचे आहे आणि घराबाहेर पडावेच लागले तर खालील गोष्टी करा.
आकाशात ढग गडगडू लागले तर पक्क्या घरांमध्ये थांबण्यास प्राधान्य द्या. वाहनात बसू नका. वाहने झाडाखाली उभी करु नका. पावसात झाडांचा अश्रय घेऊ नका. जर ढग मोठ्याने गडगडत असतील तर जमीनवर पालथे झोपा. उंच ठिकाणी जाऊ नका. (हेही वाचा, Uttar Pradesh Lightning Thunderstorm: वीज कोसळून 38 जणांचा मृत्यू; उत्तर प्रदेश राज्यातील घटना)
- मेघगर्जना होते तेव्हा तुमही 30 पेक्षा अधिक अंक मोजू शकत नाही. इतका त्याचा कालावधी कमी असतो. परंतू, त्याचा परिणाम दीर्घकाळ राहात असतो. शेवटची मेघरर्जना ऐकू आल्यापासून शक्यातो 30 मिनीटे घराबाहेर पडणे टाळा. मेघर्जनेपासून साधारण 30 मिनिटांच्या कालावधीत केव्हाही विज कोसळू शकते.
आपण मोकळ्या जागेत असाल आणि जर ढग गडगडू लागले तर उभे न राहता खाली बसा. डोके गुडघ्यात घालून जमीनीकडे तोंड करुन घट्ट डोळे मिटून घ्या. सपाट जमीनीवर बसू नका. तसे केल्याने धोका वाढू शकतो.