उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) राज्यातील 11 जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी आकाशातून वीज कोसळून (Uttar Pradesh Lightning Thunderstorm) घडलेल्या दुर्घटनेत सुमारे 38 जणांचे प्राण गेले आहेत. ही घटना रविवारी सायंकाळी घडली. प्राप्त माहितीनुसार, कानपूर आणि परिसरातील जिल्ह्यात ही घटना घटडल्याचे वृत्त आहे. प्राप्त माहितीनुसार कानपूर- 18, प्रयागराज- 14, कौशाम्बी- 4, आगरा- 3, उन्नावमध्ये दोन प्रतापगढ, वाराणसी आणि रायबरेली आदी ठिकाणी प्रत्येकी एकाचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. वीज कोसळून (Lightning Thunderstorm) काही पाळीव आणि जंगली प्राणही ठार झाल्याचे समजते.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घटनेची नोंद घेतली असून दु:खही व्यक्त केले आहे. त्यासोबत जिल्हा प्रशासनास दुर्घटनेत मृतांच्या नावतेवाईकास योग्य तो सरकारी नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. सरकारी प्रवक्त्यांनी घटनेबाबत दिलेल्या माहतीनुसार, ही दुर्घटना कानपुर, प्रतापगढ, आगरा, वाराणसी आणि रायबरेली येथे घडली. कौशंबी येथील दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांची ओळख पटली असून त्यांची नावे रुक्मा (वय12 वर्षे), मूरत ध्वज (वय 50 वर्षे), रामचंद्र (वय 32 वर्षे) आणि मयंक सिंह अशी आहेत.

फिरोजाबाद येथे 50 वर्षीय हेमराज आणि 40 वर्षीय राम सेवक यांचा मृत्यू झाला. हे दोघे एका कडूनिंबाच्या झाडाखाली उभे होते. तेव्हा आकाशातून वीज कोसळली. या घटनेत दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. वीज कोसळून शिकोहाबाद परिसरातील 60 वर्षीय अमर सिंह यांचाही मृत्यू झाल आहे. गाजीपूर आणि बालिया येथेही अशाच काही घटना घडल्याचे वृत्त आहे.

दरम्यान, ''वीज कोसळून काही नागरिक ठार झाल्याची माहिती कळताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्विटरच्या माध्यमातून दु:ख व्यक्त केले आहे. पंतप्रधान मोदी यांनी ट्विट करुन म्हटले आहे की, आकाशातून वीज कोसळून झालेल्या दुर्घटनेत काही नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. ही अत्यंत दु:खद घटना आहे. मी मृतांच्या परिवाराप्रती आपली गंभीर संवेदना व्यक्त करतो''. (हेही वाचा, Rajasthan Lightning Thunderstorm: राजस्थानमध्ये वीज कोसळून 18 ठार, अनेक जखमी)

पीएमओ ट्विट

दरम्यान, राजस्थान राज्यातही वीस कोसळून (Rajasthan Lightning Thunderstorm) वेगवेगळ्या ठिकाणी 18 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 7 लहान मुलांचाही समावेश आहे. ही घटना जयपूर, कोटा, झालावार आणि धौलपूर जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणी रविवारी घडली, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. काही प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तात 21 जणांचा मृत्यू झाला असून, त्यात 6 मुलांचा समवाशे असल्याचे म्हटले आहे. या घटनेची सर्वाधिक हानी ही जयपूर येथे पोहोचली आहे. जयपूरमध्ये 11 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये सर्वाधिक प्रमाण हे युवकांचे आहे. या घटनेत काही तरुण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत. जयपूरमधील अंबर किल्ला परिसरात हे तरुण डोंगराळ भागात टॉवरवर सेल्फी घेत असताना ही घटना घडली.