Lightning | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com

राजस्थान राज्यात वीस कोसळून (Rajasthan Lightning Thunderstorm) वेगवेगळ्या ठिकाणी 18 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 7 लहान मुलांचाही समावेश आहे. ही घटना जयपूर, कोटा, झालावार आणि धौलपूर जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणी रविवारी घडली, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. काही प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तात 21 जणांचा मृत्यू झाला असून, त्यात 6 मुलांचा समवाशे असल्याचे म्हटले आहे. या घटनेची सर्वाधिक हानी ही जयपूर येथे पोहोचली आहे. जयपूरमध्ये 11 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये सर्वाधिक प्रमाण हे युवकांचे आहे. या घटनेत काही तरुण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत. जयपूरमधील अंबर किल्ला परिसरात हे तरुण डोंगराळ भागात टॉवरवर सेल्फी घेत असताना ही घटना घडली.

जपूर पोलीस आयुक्त आनंद श्रीवास्तव यांनी माहिती देताना सांगितले की, या घटनेत 11 जणांचा मृत्यू तर 8 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर आणखी काहीजण या घटनेत बाधीत झाले आहेत का याचा शोध घेतला जात आहे.

दरम्यान, ''वीज कोसळून काही नागरिक ठार झाल्याची माहिती कळताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्विटरच्या माध्यमातून दु:ख व्यक्त केले आहे. पंतप्रधान मोदी यांनी ट्विट करुन म्हटले आहे की, आकाशातून वीज कोसळून झालेल्या दुर्घटनेत काही नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. ही अत्यंत दु:खद घटना आहे. मी मृतांच्या परिवाराप्रती आपली गंभीर संवेदना व्यक्त करतो''. (हेही वाचा, Lightning Kills Boy in Palghar: मोबाईल नेटवर्क शोधण्यासाठी झाडावर चढले, तेवढ्यात वीज कोसळली; एक ठार, तिघे जखमी; पालघर जिल्ह्यातील घटना)

पीएमओ ट्विट

दरम्यान, उत्तर प्रदेशमध्येही वीज कोसळून जवळपास 40 लोकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. कानपूर आणि परिसरातील जिल्ह्यात ही घटना घटडल्याचे वृत्त आहे. प्राप्त माहितीनुसार कानपूर- 18, प्रयागराज- 14, कौशाम्बी- 4, आगरा- 3, उन्नावमध्ये दोन प्रतापगढ, वाराणसी आणि रायबरेली आदी ठिकाणी प्रत्येकी एकाचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. वीज कासळून काही पाळीव आणि जंगली प्राणही ठार झाल्याचे समजते.