आर्थिक वर्ष 2021-22 चा मार्च हा शेवटचा महिना आहे. या वर्षअखेरीच्या महिन्यात अनेकांची टॅक्स संबंधी बचत करण्याची आणि त्या निगडीत अन्य कामांची धावाधाव सुरू होते. त्यामुळे हा महिना महत्त्वाचा असतो. दरम्यान या महिन्यात पैशांसंबंधी तुम्ही काही जुळ्वाजुळव करत असाल तर अन्य काही महत्त्वाच्या डेडलाईन देखील जाणून घ्या. अन्यथा तुम्हांला काही आर्थिक भुर्दंड भरावा लागू शकतो. या महिन्यातच तुम्हांला अद्याप आधार-पॅन लिंकिंग केले नसल्यास ते काम पूर्ण करणं आवश्यक आहे तसेच केवायसी अपडेट करण्याचा देखील हा शेवटचा महिना आहे.
मार्च 2022 ही डेडलाईन असलेली महत्त्वाची कामं
आयटीआर फाईल
तुम्ही अद्याओ 2020-21 या वर्षाचा रिवाईज्ड किंवा सविस्तर इन्कम टॅक्स रिटर्न भरला नसेल तर तो भरण्यासाठी 31 मार्च ही डेडलाईन आहे. टॅक्स पेअर्स 31 मार्च 2022 पर्यंत रिटर्न फाईल करू शकतात. डिटेल इन्कम तॅकस रिटर्न फाईल न केल्यास 10हजार पर्यंत लेट फाईन द्यावा लागेल. जर तुमचं उत्पन्न 5 लाखापर्यंत असेल तर तुम्हांला 1 हजार शुल्क द्यावा लागेल.
पॅन-आधार लिंकिंग
सध्याच्या नियमावलीनुसार, पॅन सोबत आधार नंबर जोडणं अनिवार्य आहे. याची डेडलाईन कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर वाढवून 31 मार्च 2022 करण्यात आली आहे. त्यामुळे ज्यांनी अद्याप हे लिकिंग केले नाही त्यांनी या महिन्याअखेरीस करावं. अन्यथा 1 एप्रिल 2022 पासून ते कार्ड निष्क्रिय ठरवलं जाईल. हे देखील नक्की वाचा: PAN-Aadhaar Linking Deadline: पॅन-आधार जोडणी 31 मार्च पर्यंत करा अन्यथा 'या' आर्थिक दंडाला जावं लागेल सामोरे!
बॅंक खात्यामध्ये केवायसी अपडेत
मार्च महिना संपण्याआधी तुम्हांला बॅंक खात्यामध्ये केवायसी अपडेट करणं देखील आवश्यक आहे. तसे न केल्यास तुम्हांला अडचण होऊ शकते. केवायसी अपडेट नसलेल्या बॅंक खात्यांना आता फ्रीज केले जाणार आहे. तुम्हांला केवायसी साठी ओळखीचं प्रमाणपत्र, रहिवासी पत्त्याचा पुरावा द्यावा लागणार आहे.
अॅडव्हान्स टॅक्स भरण्याची मुदत
आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये अॅडव्हान्स टॅक्स भरण्याची अंतिम मुदत 15 मार्च आहे. तर टीसीएस नंतर एकूण टॅक्स देणं 10 हजार पेक्षा जास्त असेल. या टॅक्सला दर तिमाही नंतर एका विशिष्ट तारखेला भरणं आवश्यक आहे. जर कुणी अॅडव्हान्स टॅकस भरू शकत नसेल तर त्याला धारा 234ए / 234 बी अंतर्गत व्याज लागू होते.