PAN-Aadhaar Linking Deadline: पॅन-आधार जोडणी 31 मार्च पर्यंत करा अन्यथा 'या' आर्थिक दंडाला जावं लागेल सामोरे!
PAN Card-Aadhar Card Link (File Photo)

PAN Card धारकांना त्यांचा Permanent Account Number (PAN)आधार कार्ड सोबत जोडण्यासाठी आता 31 मार्च 2022 पर्यंतच मुदत आहे. या अंतिम मुदतीपर्यंत पॅन-आधार जोडणी न केल्यास संबंधित व्यक्तीचं पॅन कार्ड अपात्र होणार आहे. सोबतच पॅन-आधार लिकिंग साठी संबंधित व्यक्तीला 1 हजार रूपयांचा फाईन आकारला जाणार आहे. दरम्यान हे सारं इतक्यावरच थांबणार नाही तर त्या व्यक्तीला म्युचल फंड, स्टॉक्समध्येही गुंतवणूक करण्यात अडचणी येणार आहेत. बॅंक अकाऊंट उघडणं कठीण होईल. त्यामुळे पॅन कार्ड लिंकिंग कडे दुर्लक्ष करू नका.

पॅन आणि आधार लिकिंग साठी यापूर्वी 30 सप्टेंबर 2021 पर्यंत अंतिम मुदत होती पण कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर यामध्ये मुदतवाढ करत 31 मार्च करण्यात आली आहे. असे डिरेक्ट टॅक्स विभागाने जारी केलेल्या नोटीसी मध्ये म्हटलं आहे. पॅन कार्ड लिंक नसल्यास इन्कम टॅक्स रिटर्न भरतानाही अडचणींचा सामना करावा लागतो. दरम्यान अशा व्यक्तींना टीडीएस मध्ये मोठी रक्कम भरावी लागू शकते.सोबतच section 272B of the Income Tax Act नुसार दहा हजारांचा दंड होऊ शकतो. हे देखील वाचा: Aadhaar Card वरुन ड्युप्लिकेट PAN Card कसे मिळवाल? जाणून घ्या सोप्या स्टेप्स.

 आधार-पॅन ऑनलाईन लिंक कसे कराल?

# ऑनलाईन आधार-पॅन लिंक करण्यासाठी इन्कम टॅक्सच्या ऑफिशियल साईट incometaxindiaefiling.gov.in. ला भेट द्या.

# त्यातील 'Link Aadhaar' या सेक्शनवर क्लिक करा.

# तिथे पॅन नंबर, आधार क्रमांक आणि इतर महत्त्वाची माहिती भरा.

# एकदा सर्व माहिती भरुन झाल्यावर 'Link Aadhaar' वर क्लिक करुन सब्मिट बटण दाबा.

ऑनलाईन प्रमाणेच तुम्ही घरबसल्या SMS च्या माध्यमातूनही पॅन कार्ड - आधार कार्ड लिंक करू शकता. यासाठी तुम्हांला UIDAIPAN(12digit Aadhaar number) स्पेस (10 digit PAN Number) या फॉर्मेट मध्ये एक एसएमएस 567678 किंवा 56161 या नंबरवर पाठायचा आहे.