Aadhaar Card वरुन ड्युप्लिकेट PAN Card कसे मिळवाल? जाणून घ्या सोप्या स्टेप्स
Aadhaar Card-PAN Card | File Image

आधार कार्ड (Aadhaar Card) आणि पॅन कार्ड (PAN Card) हे महत्त्वाचे ओळखपत्रं आहेत. अनेक कामं यामुळे अगदी सहज सोपी होतात. अशातच जर तुमचे पॅन कार्ड हरवल्यास किंवा चोरीला गेल्यास तुम्ही ड्युप्लिकेट पॅन कार्ड (Duplicate PAN Card) काढू शकता. पॅन कार्ड जर तुमच्या वॉलेटमध्ये असेल आणि जर तुमचे वॉलेट चोरीला गेले तर अशा परिस्थितीही तुम्ही ड्युप्लिकेट पॅन कार्डसाठी अप्लाय करु शकता. जर तुमच्याकडे असलेले पॅन कार्ड खराब झाल्यास किंवा त्यातील माहितीत काही बदल करायचे असतील तर तुम्ही पॅन कार्ड रिप्रिंट करु शकता.

पॅन कार्ड बनवताना दिलेली सही जर तुम्हाला आता बदलायची असेल तरीही तुम्ही त्यासाठी अप्लाय करु शकता. NSDL च्या वेबसाईटमध्ये आधार कार्डचा वापर करुन पॅन कार्ड डाऊनलोड करण्याचा पर्याय दिला आहे. खाली दिलेल्या सोप्या स्टेप्स वापरुन तुम्ही ड्युप्लिकेट पॅन कार्डसाठी रिक्वेस्ट करु शकता. (तुमच्या Aadhaar Card वरुन इतर कोणी SIM घेतले आहे का? 'या' पद्धतीने घ्या जाणून)

ड्युप्लिकेट पॅन कार्डसाठी कसे अप्लाय कराल?

# TIN-NSDL या इन्कम टॅक्स विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्या.

# इथे तुम्हाला तुमचा पॅन कार्ड नंबर, आधार नंबर, जन्मतारीख आणि जीएसटीआयएन (GSTIN) देणे आवश्यक आहे.

# ‘Terms and conditions’ च्या चेक बॉक्सला सिलेक्ट करा.

# तुम्हाला दिसत असलेला  Captcha code एंटर करा आणि सम्बिट बटणवर क्लिक करा.

# यानंतर तुम्ही एका नवीन वेबपेजवर रिडिरेक्ट व्हाल.

# यानंतर ओटीपीचा पर्याय निवडा.

# तुमच्या मोबाईल नंबर आणि ईमेल आयडीवर मिळालेला ओटीपी एंटर करा.

# व्हॅलिडेट बटणवर क्लिक करा आणि ड्युप्लिकेट पॅनकार्डची रिक्वेस्ट सम्बिट करा.

त्यामुळे पॅनकार्ड हरवल्यास गोंधळून जाण्याची गरज नाही. अशाप्रकारे आधार कार्डच्या साहाय्याने तुम्ही ड्युप्लिकेट पॅन कार्डसाठी अप्लाय करु शकता.