अर्थसल्ला: स्टॉक मार्केटच्या तुलनेत म्युच्युअल फंडात गुंतवणूक किती सुरक्षित..?
गुंतवणूक (संग्रहित, संपादित आणि प्रतिकात्मक प्रतिमा)

गुंतवणूक हा तसा सर्वांच्याच जिव्हाळ्याचा प्रश्न. कमावलेल्या पैशांतून केलेली बचत ही योग्य ठिकाणी गुंतवली जाणे हे भविष्यातील संपत्ती वाढण्यासाठी प्रचंड महत्त्वाचे असते. म्हणूनच अनेक लोक गुंतवणुकीसाठी विविध पर्याय वापरतात. म्युच्युअल फंड हा त्यापैकीच एक. पण, अनेकांचा संभ्रम असा की, बचतीसाठी स्टॉक मार्केटमधील गुंतवणूक चांगली की, म्युच्युअल फंडातील गुंतवणूक? आपला हा संभ्रम काहीसा दूर करण्यासाठी आम्ही येथे म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीबाबत काही माहिती देत आहोत...

आपण जेंव्हा म्युच्युअल फंडात रक्कम गुंतवतो तेव्हा, आपल्याला फंड मॅनेजरच्या विशेष ज्ञानाचा फायदा होतो. कर (टॅक्स) निवड, टॅक्सपद्धती, सेक्टर बनविणे आणि अॅसेट अॅलोकेशन यांसारख्या विविध गोष्टींवर फंड मॅनेजर काम करतात. प्रोफेशनल फंड मॅनेजर हे सांगतात की, तुम्ही अशाच म्युच्युअल फड्समध्ये गुंतवणूक करावी ज्यामध्ये आपल्याला परतावाही तितक्याच चांगल्या पद्धतीने मिळेल.

आपण जेव्हा म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना आपला पोर्टफोलिओ स्वत: मॅनेज करतो तेव्हा, फंड्सची खरेदी विक्री आपण स्वत:च करतो. जर आपण एक वर्षाच्या आत स्टॉक विकता तर, आपल्याला १५ टक्के शॉकर्ट टर्म कॅपिटल गेन्स टॅक्स द्यावा लागतो. म्युच्युअल फंडाबाबत बोलायचे तर यात कॅपीटल गेन्स टॅक्स असत नाही. गुंतवणूकदाराला हाही एक मोठा फायदा मिळतो.

तुम्ही जर स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करत असाल तर, ०.५ पासून १ टक्क्यांपर्यंत ब्रोकरेज शूल्क द्यावे लागते. याशिवाय डीमॅट अकाऊंटसाठीही वेगळे शूल्क द्यावे लागते. मात्र, म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना आपल्याला केवळ ब्रोकरेज चार्जच द्यावा लागतो. याचाही थेट फायदा फंड गुंतवणूकदाराला होतो. त्यासाठी आपल्याला डीमॅट अकाउंटची आवश्यकता नाही. (हेही वाचा, 'ईपीएफओ'मध्ये लवकरच परिवर्तन; व्याजदरातही होणार मोठे फेरबदल)

जर आपण वेगवेगळ्या स्टॉक्समध्ये गुंतवणूक करुन आपली रक्कम सुरक्षित ठेऊ इच्छित असाल तर, २५ ते ३० स्टॉक्समध्ये गुंतवणूक करणे आवश्यक आहे. सर्वसामान्य गुंतवणूकदाराला हे शक्य असत नाही. त्यामुळे म्युच्युअल फंड्सच्या माध्यमातून आपण डायव्हर्स इन्वेस्टमेंट करु शकता.

... तर हा आहे स्टॉक मार्केट आणि म्युच्युअल फंड यांच्यातील फरक..