Representational Image |(Photo Credits: PTI)

तुम्ही प्रवास करायचं नियोजन करत आहात पण तिकीट बुकींचा प्रश्न भेडसावत आहे तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. ईयर एण्डींग, ख्रिसमस आणि न्युईयरचा मुहूर्त साधत जर तुम्ही कुठे फिरायला जायचा प्लान करणार असाल तर तुमच्या ड्रिम डेस्टीनेशनवर जायचं तिकीट बुक करणं गरजेचं असतं.  बस प्रवास कंटाळवाणा, विमान प्रवास महागडा मग पर्याय उरतो तो फक्त रेल्वे प्रवासाचा. रेल्वे प्रवास सरकारी, सोयिस्कर आणि सर्वसामान्यांना परवडण्यासारखा. पण रेल्वेच्या तिकीट हल्ली तिन महिन्यांपूर्वीच बुक झालेली दिसतात. तरी तुम्ही आता वेळेवर रेल्वे तिकीट बुक करण्याच्या विचारात असाल तर आम्ही तुम्हाला काही महत्वाच्या टिप्स देणार आहोत. रेल्वे तिकिटांच्या झटपट बुकींगसाठी भारतीय रेल्वेकडून तत्काळ तिकीट बुकींगचा ऑप्शन देण्यात आला आहे. तरी तुम्हाला तत्काळ तिकीट कसं बुकींग करायचं याबाबत आम्ही महत्वाची माहिती देणार आहोत.

 

तत्काळी तिकीट बुकींगला प्रवास करण्याच्या एक दिवस आधी सुरुवात होते. म्हणजे तुम्हाला २५ डिसेंबरचं तिकीट बुक करायचं असल्यास २४ डिसेंबरला तत्काळ तिकीट बुक करता येत. तरी यांत देखील काही वेगवेगळे नियम आहेत. म्हणजे स्लीपर कोचच्या तिकीट बुकींगला सकाळी अकरा वाजता सुरुवात होते तरी शक्य तेवढ्या लवकर तुम्ही तुमची तिकीट बुक करायची कारण अवघ्या काही मिनिटांतचं रेल्वेचे तत्काळ तिकीट कोटा फुल होतो. म्हणुन साधारण सव्वा अकरा पुर्वी तिकीट बुकींग करावं. (हे ही वाचा:- Bank Holidays in December 2022: डिसेंबरमध्ये 13 दिवस बँका बंद राहणार; RBI ने जाहीर केली सुट्ट्यांची यादी)

 

तर तुम्हाला एसी कोचचं तत्काळ तिकीट बुक करायचं असल्यास भारतीय रेल्वेचे नियम वेगळे आहे. सकाळी दहा वाजता पासून तत्काळ कोट्याच्या तिकिट बुकींगला सुरुवात होते. तर १० वाजून १५ मिनिटांपर्यत तुम्ही ही बुकींग करु शकता. भारतीय रेल्वेच्या ऑफिशीअल वेबसाईट किंवा मोबाईल अपच्या सहाय्याने तुम्ही तुमच्या मोबाईल फोनवरुन सहज तिकीट बुकींग करु शकता.