Bank Holidays December 2022: काही दिवसांनी डिसेंबर (December) म्हणजेच वर्षाचा शेवटचा महिना सुरू होणार आहे, या महिन्यात बरेच लोक आपल्या कुटुंबियांसोबत सुट्टीवर जातात. तुमचाही कुठेतरी प्रवासाचा प्लॅन असेल तर तुम्हाला बँकेचे काम वेळेवर निपटावे लागेल. ख्रिसमस ते डिसेंबरपर्यंत अनेक सुट्ट्या असतात. देशातील विविध राज्यांमध्ये अनेक सणांसाठी स्वतंत्र सुट्टी देण्याची तरतूद आहे. डिसेंबर महिन्यात एकूण 13 दिवस बँका बंद राहणार आहेत. त्यात चार रविवारचाही समावेश आहे. त्यामुळे डिसेंबरमध्ये बँका कोणत्या दिवशी बंद राहतील आणि कोणत्या दिवशी उघडतील हे तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे. डिसेंबर महिन्याच्या सुट्ट्यांची संपूर्ण यादी जाणून घ्या.
देशभरात 6 दिवस बँका बंद राहणार -
डिसेंबरमध्ये संपूर्ण देशात 6 दिवस बँकांना सुट्ट्या असतील. यामध्ये दुसरा आणि चौथा शनिवार तसेच रविवारच्या सुट्ट्यांचा समावेश आहे. 4, 10, 11, 18, 25 आणि 31 डिसेंबर रोजी देशभरात बँका बंद राहणार आहेत. यामध्ये दुसरा शनिवार 10 रोजी तर चौथा शनिवार 31 रोजी असणार आहे. रविवार असल्याने उर्वरित दिवस सुट्टी असणार आहे. (हेही वाचा - Finance Rule Changes: 1 डिसेंबर पासून आर्थिक व्यवहारात होणार मोठे बदल; सिलेंडर-सीएनजीच्या किमतीपासून ते पेंशनधारक आणि बॅंकेच्या नियमात मोठे बदल)
डिसेंबरमधील सुट्ट्यांची संपूर्ण यादी -
- 3 डिसेंबर - शनिवार - सेंट झेवियर्स उत्सव - गोव्यात बँक बंद
- 4 डिसेंबर - रविवार - बँक बंद - देशभर
- 10 डिसेंबर - शनिवार - दुसरा शनिवार - देशभरात बँका बंद राहतील
- 11 डिसेंबर - रविवार - सुट्टी - देशभरात बँका बंद
- 12 डिसेंबर - सोमवार - पा-तगान नेंगमिंजा संगम- मेघालयात बँक बंद
- 18 डिसेंबर - रविवार - सुट्टी - बँक देशभरात बंद
- 19 डिसेंबर - सोमवार - गोवा मुक्ती दिन - गोव्यात बँक बंद
- 24 डिसेंबर - शनिवार - ख्रिसमस आणि चौथा शनिवार - देशभरातील बँक बंद
- 25 डिसेंबर - रविवार - सुट्टी - देशभरात बँका बंद
- डिसेंबर 26 - सोमवार - ख्रिसमस, लासुंग, नामसंग - मिझोराम, सिक्कीम, मेघालय येथे बँक बंद
- 29 डिसेंबर - गुरुवार - गुरु गोविंद सिंग जी यांचा जन्मदिन - चंदीगडमध्ये बँक बंद
- 30 डिसेंबर - शुक्रवार - शुक्रवार- यू कियांग नंगवाह- मेघालयात बँक बंद
- 31 डिसेंबर - शनिवार - नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला - मिझोरममध्ये बँक बंद
या सुट्ट्यांमध्ये अनेक प्रादेशिक सुट्ट्यांचाही समावेश आहे. आयबीआय सुट्ट्यांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी करते. मात्र, बँकांचे काम ऑनलाइन सुरू राहणार आहे. तुम्ही इंटरनेट बँकिंग आणि UPI द्वारे सहज पेमेंट करू शकता. बँकांमध्ये काही सुट्ट्या राष्ट्रीय असतात ज्या सर्व बँकांसाठी वैध असतात. पण अनेक राज्यांमध्ये प्रादेशिक सुट्ट्याही असतात, या सुट्ट्या राज्यांच्या सणांवर अवलंबून असतात. राष्ट्रीय स्तरावर बोलायचे झाल्यास, 3, 4, 10, 11, 18, 24 आणि 25 डिसेंबर रोजी बँका एकाच वेळी बंद राहतील.