२०२२ वर्षाचा शेवट अगदी एका महिन्यावर येवून ठेपला आहे. तरी या वर्षाच्या शेवटच्या महिन्यात आर्थिक व्यवहारावर मोठा फरक पडण्याची शक्यता आहे. कारण येत्या एक डिसेंबर (December) पासून काही व्यवहार बदलण्याची शक्यता आहे. नेमके हे आर्थिक बदल कुठले या बाबत सविस्तर माहिती (Detail Information) आम्ही तुम्हाला देणार आहोत. या नव्या नियमांचा थेट तुमच्या खिशावर परिणाम पडू शकतो. तरी हे नवे आर्थिक नियम नेमके कुठले, पेंशन (Pension) धारकांसाठी नव्या सुचना काय, सिंलेडर (Cylinder) ते सिएनजीच्या किमतीतील (CNG Price) बदल आणि बॅंकेच्या व्यवहारात कोणत मोठे बदल हे आपण जाणून घेणार आहोत.
एलपीजी, सीएनजी, पीएनजी दरात मोठे बदल:-
दर महिन्याच्या १ तारखेला एलपीजी सिलेंडर, सीएनजी आणि पीएनजीच्या दरात बदल होताना दिसतात. जवळपास गेल्या सहा महिन्यात घरगूती सिलेंडरच्या दरात कुठलाही मोठा बदल झालेला नसला तरी या महिन्यात म्हणजेचं वर्षाच्या शेवटी घरगूती एलपीजी सिलेंडरच्या दरात बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच कमर्शिल वापरातील म्हणजे हॉटेल किंवा सार्वजनिक ठिकाणांवर वापरण्यात येणाऱ्या एलपीजी सिलेंडरच्या दरात देखील वाढ अपेक्षित आहे. एवढचं नाही तर सीएनजी आणि पीएनजी वाहन धारकांसाठी देखील महत्वाची बातमी आहे. डिसेंबर महिन्याच्या पहिल्याचं दिवशी सीएनजी-पीएनजी दरात बदल होणार असल्याची माहिती मिळत आहे.
पेंशन धारकांसाठी जिवन प्रमाणपत्र:-
सरकारी नोकरीत असलेल्या आणि आता निवृत्त झालेल्या पेंशनधारकांठी एक महत्वाची बातमी आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या निवृत कर्मचाऱ्यांना आपलं जिवन प्रमाणपत्र आपल्या पेंशन अकाउंट असलेल्या बॅंकेत सबमिट करणं अनिवार्य आहे. ३० नोव्हेंबर पर्यत ही प्रक्रीया पूर्ण करण्याचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले आहे. तरी जिवन प्रमाणपत्र आपल्या सलग्न बॅंकेत सबमिट करण्यासाठी ३० नोव्हेंबर ही शेवटची तारख असल्याची सुचना बॅंक प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. एवढचं नाही तर हे प्रमाणपत्र सबमिट न केल्यास याचा परिणाम थेट पेंशन धारकांना दरमहा मिळणाऱ्या पेंशनवर होवू शकतो म्हणून शक्य तेवढ्या ताबडतोब ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन पेंशन धारकांना करण्यात आले आहे.
१३ दिवस बॅंकेला सुट्टी:-
२०२२ च्या शेवटच्या महिन्यात म्हणजेचं डिसेंबरमध्ये भरभरुन सरकारी सुट्ट्या आहेत. या सुट्ट्यांच्या कालावधीत महिन्याच्या एकूण ३० दिवसांपैकी केवळ सतरा दिवस बॅंकेचे व्यवहार केल्या जाणार आहे. कारण डिसेंबर महिन्यात तब्बल तेरा सरकारी सुट्ट्या आहे. तरी तुम्ही डिसेंबरमध्ये बॅंकेचे मोठे व्यवहार करण्यचे नियोजन करत असल्यास या सुट्ट्याचा कालावधी लक्षात घेता नंतरचं तुमचं पुढील नियोजन आखा. नाताळ, गुरु गोविंद सिंह जयंती, शनिवार-रविवार सणासुद असं सगळं एकत्र बघता डिंसेंबर महिन्यात तब्बल तेरा बॅंक हॉलेडेज आहेत.