Driving Licence Renewal: घरबसल्या करा ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू; फॉलो करा 'या' सोप्या स्टेप्स
Driving License | Representational Image (File Photo)

ड्रायव्हिंग लायसन्स (Driving Licence) हे महत्त्वाच्या ओळखपत्रांपैकी एक. कोविड-19 (Covid-19) संकटकाळात खाजगी वाहनांचा वापर करण्यावर अनेकांचा भर आहे. वाहन वापरताना त्याची योग्य कागदपत्रे विशेषत: लायसन्स जवळ असणे अतिशय महत्त्वाचे आहे. तसंच त्याची मूदत संपलेली असल्याचे ते रिन्यूव्ह करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अन्यथा वाहतुक पोलिसांनी पकडल्यास तुम्हाला दंड भरावा लागेल. यापूर्वी लायसन्स रिन्यू करण्यासाठी आरटीओ (RTO) कार्यालयात जावे लागत असे. आता मात्र आरटीओच्या खेपा घालण्याची गरज नाही. घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू करु शकता. तसंच कोविड-19 संकटात गर्दी टाळण्यासाठी देखील हा अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय आहे. (वाहन चालकांना आता Driving Licence आणि RC सारखी महत्वाची कागपत्रे व्यक्तिगत सांभाळण्याची गरज नाही, स्मार्टफोनच्या माध्यमातून अशा पद्धतीने करा Access)

त्यासाठी सर्वप्रथम फॉर्म डाऊनलोड करुन भरा. त्यानंतर स्कॅन करुन अपलोड करा. 40 वर्षांपेक्षा अधिक वर्षांच्या व्यक्तींना डॉक्टरांनी भरलेला फॉर्म 1 ए देणे आवश्यक असणार आहे. त्याचबरोबर जुने ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट साईज फोटो, आधार कार्ड फोटोही अपलोड करावा लागेल. या सर्व गोष्टी तुम्हाला ऑनलाईन करता येतील. जाणून घेऊया सोप्या स्टेप्स... (तुमचा वाहन परवाना हरवला आहे? 'या' पद्धतीने तुम्हाला मिळवता येईल डुप्लिकेट Driving Licence)

# ड्रायव्हिंग लायन्सन रिन्यू करण्यासाठी सर्वप्रथम भारत सरकारच्या रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाईटवर parivahan.gov.in/parivahan/ ला भेट द्या. तेथील डावीकडे असलेल्या ऑनलाईन पर्यायावर क्लिक करा.

# त्यानंतर सर्व्हिसेस ऑन ड्रायव्हिंग लायन्सन वर क्लिक करा आणि माहिती भरा.

# कागदपत्रंही जोडा. त्यानंतर ऑनलाईन प्रोसेस पूर्ण होते.

# त्यानंतर काही दिवसांत रिन्यू ड्रायव्हिंग लायसन्स तुम्ही दिलेल्या पत्त्यावर येईल.

अशा पद्धतीने तुम्ही घरबसल्या ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू करु शकता. त्यामुळे तुमची दगदग आणि वेळही वाचेल.