तुमचा वाहन परवाना  हरवला आहे? 'या' पद्धतीने तुम्हाला मिळवता येईल डुप्लिकेट Driving Licence
प्रतिकात्मक फोटो (File Photo)

ज्या  वेळेस तुम्ही वाहन चालवता त्यावेळी तुमच्या सोबत वाहन परवाना (Driving Licence) ठेवणे अनिवार्य आहे. कारण ड्रायव्हिंग लायसन्स शिवाय जर तुम्ही वाहन चालवत असल्यास तुमच्यावर कठोर कारवाई केली जाऊ शकते. मात्र काही वेळेस असे होते की, तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स हरवते किंवा चोरी होते. अशा वेळी आपल्याला त्याबद्दल चिंता वाटते. परंतु यामध्ये टेन्शन घेण्याची कोणतीच गरज न्ही आहे. कारण ड्रायव्हिंग लायसन्स हरवले किंवा खराब होण्याच्या स्थितीत असल्यास तुम्ही ते डुप्लिकेट पद्धतीने ही मिळवू शकता. त्यासाठी मात्र तुम्हाला अर्ज करावा लागणार आहे. (Car Care in Winter: थंडीच्या दिवसात गाडी उत्तम स्थितीत ठेवण्यासाठी 'या' टिप्स जरुर लक्षात ठेवा)

काही राज्यांच्या RTO विभागाकडून डुप्लिकेट ड्रायव्हिंग लायसन्स ऑनलाईन पद्धतीने अर्ज करुन मिळवता येण्याची सुविधा ही उपलब्ध करुन दिली आहे. मात्र काही ठिकाणी ही सुविधा नाही आहे. अशावेळी तुम्हाला तुमच्या येथील परिवहन विभागाच्या वेबसाईटवर जावे लागणार आहे. येथे तुम्हाला अगदी सोप्प्या पद्धतीने याची माहिती दिली जाणार आहे. तर तुम्हाला वेबसाइटवर ऑनलाईन पद्धतीने डुप्लिकेट लायसन्स मिळवण्याची सुविधा दिली जात असेल तर 'या' काही स्टेप्स वापरुन ते तुम्ही मिळवू शकता.

>>डुप्लिकेट ड्रायव्हिंग लायसन्ससाठी 'या' स्टेप्सचा वापर करा:

-सर्वात प्रथम तुमच्या राज्याच्या वाहतुक विभागाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.

- तेथे तुम्हाला तुमची माहिती द्यावी लागणार असून LLD फॉर्म भरावा लागणार आहे.

-हा फॉर्म भरल्यानंतर त्याची प्रिंट आइट जरुर मिळवा.

-मात्र ज्यावेळी तुमच्याकडे महत्वाची कागदपत्रे मागितली जातील त्यावेळी ती अटॅच करा.

-ही कागदपत्रे तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने RTO ऑफिसमध्ये सादर करु शकता.

-या स्टेप्स फॉलो केल्यानंतर पोस्टाच्या माध्यमातून तुम्हाला तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स दिले जाईल. मात्र तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स मिळत नाही तो पर्यंत अर्जाची पावती सांभाळून ठेवावी लागणार आहे. (बाइक आणि स्कूटरचा Insurance काढण्यापूर्वी 'या' गोष्टी जरुर लक्षात ठेवा अन्यथा होईल नुकसान)

तर ऑफलाईन पद्धतीने ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यासाठी तुम्हाला RTO ऑफिसला भेट द्यावी लागणार आहे. त्याचसोबत तेथे ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्याची प्रोसेस फॉलो केल्यानंतर तुमच्याकडून 200 रुपयांचा शुल्क ही भरावा लागणार आहे. त्यानंतरच तुम्हाला तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स पत्त्यावर पाठवले जाणार आहे.