
भारतात सर्वाधिक दुचाकी वाहनांची विक्री केली जाते. कारण येथील नागरिक चार चाकांऐवजी दुचाकी वाहनांना अधिक पसंदी देतात. जवळजवळ 21 मिलियन दुचाकी वाहनांसह भारत हा अपघाताच्या दुर्घटनेत ही पुढे आहे. एका सर्वेनुसार, भारतात 2018 मध्ये 4 लाखांहून अधिक रस्ते अपघाताची प्रकरणे समोर आली. यामध्ये कार, ट्रक, सायकल आणि पायी चालणाऱ्या प्रवाशांचा समावेश आहे. या आकडेवारीत दुचाकी वाहनांचा 35.2 टक्के समावेश आहे.(Fire Safety Gadgets: कार मध्ये आग लागण्यापासून बचाव करतील 'हे' गॅजेट्स, किंमत 500 रुपयांपासून सुरु)
जर तुम्ही हे पाहून विचार करत असाल की, घरातील एखादी व्यक्ती दुचाकीवरुन बाहेर जात आहे. तर त्यावेळी त्रस्त होण्याऐवजी योग्य इंन्शुरन्सकडे लक्ष द्या. कारण इंन्शुरन्स हा तुमच्या वाहनाचे महत्वपूर्ण कागदपत्रांपेकी एक भाग आहे. त्यामुळे इंन्शुरन्सची खरेदी करण्यापूर्वी काही गोष्टी जरुर लक्षात ठेवा. अन्यथा तुमचे अधिक नुकसान होण्याची शक्यता आहे.
इन्शुरन्स खरेदी करताना त्यासाठी दिला जाणारा क्लेम आणि त्यामधून तुम्हाला किती फायदा होणार आहे याकडे आधी लक्ष द्या. मात्र जर तुम्हाला इन्शुरन्स बद्दल अधिक माहिती नसल्यास एखाद्या जाणकर व्यक्तीची या संदर्भात मदत घ्या. ऐवढेच नाही तर तुम्ही ज्या कंपनीकडून इन्शुरन्स खरेदी करत आहात ती कंपनी तुमच्या सेवेसाठी नेहमीच उपलब्ध असेल का हे सुद्धा माहिती करु घ्या.
तर एखादी दुर्घटना झाल्यास तुमची इन्शुरन्स कंपनी तुमच्यासाठी धावून आली पाहिजे. उदाहणार्थ, जर तुमची बाइक चोरी झाल्यास तुम्हाला कागदोपत्री कारवाईला समोरे जावे लागते. यासाठीच लक्षात ठेवा इन्शुरन्स खरेदी करताना तुमची कंपनी तुम्हाला त्यावेळी पूर्णपणे सहकार्य करेल.(Online (Ola, Uber & Meru) Taxi Service: सुखद प्रवासासाठी ओला, उबर आणि मेरु यांसारख्या ऑनलाईन टॅक्सी सर्व्हिसेसचा लाभ घेण्यासाठी कसे कराल बुकींग?)
इन्शुरन्स कंपन्या या नेहमीच दुर्घटनेच्या वेळेस मदतीसाठी उभ्या असतात. परंतु वाहन चालकाने आपल्या सोबत कोणतीही दुर्घटना होणार नाही याची खबरदारी घ्यावी. जर तुम्ही संपूर्ण वर्ष वाहन चालवताना साधगिरी बाळगत असल्यास कंपनीकडून तुम्हाला नो क्लेम बोनस दिला जातो. तसेच एखादा इन्शुरन्स घेण्यापूर्वी त्या बद्दलच्या नियम आणि अटीं बद्दल जरुर वाचा.