Fire Safety Gadgets: तुम्ही नेहमीच ऐकले असेल की कारमध्ये कधी कधी अचानक आग लागते. कार मध्ये आगल लागण्याची कारणे विविध असू शकतात. बहुतांश अशा पद्धतीच्या घटना या कारमध्ये बसलेल्यांच्यामुळेच होतात. असा प्रकार काही वेळेस तुमच्या जीवावर सुद्धा बेतू शकतो. याच कारणास्तव आज आम्ही तुम्हाला असे काही गॅजेट्स सांगणार आहोत जे तुम्ही नेहमीच तुमच्या गाडीत ठेवा. असे केल्यास कारमध्ये आग लागल्याची घटना घडल्यास त्यावर तुम्ही वेळीस उपयायोजना करु शकता.(कार खरेदी करण्याचा विचार करत असल्यास 5 लाखांहून कमी किंमती मधील 'या' हॅचबॅक गाड्यांबद्दल जरुर जाणून घ्या)
पोर्टेबल फायर एक्सटिंग्विशर हे सामान्यपणे मोठ्या आकाराचे असते. मात्र आजकाल मार्केटमध्ये फायर एक्सटिंग्विशर पोर्टेबल पद्धतीचे सुद्धा उपलब्ध आहेत. हे एक स्टिंग तुम्ही गाडीत अगदी सहजपणे कुठेही ठेवू शकता. याचा आकार कोणत्याही डिओड्रंटच्या बॉटलप्रमाणे असतो. गरज भासल्यास ते फक्त आगीच्या वरुन स्प्रे करायचे असते. त्यामुळे आग विझण्यास मदत होईल. याची किंमत 500-1500 रुपयांपर्यंत आहे.
दुसरे म्हणजे इलेक्ट्रिक वॉटर स्प्रे जो कोणत्याही पद्धतीच्या डिओड्रंटच्या बॉटेलसारखाच असतो. यामध्ये एक बटण दाबताच त्यामधून पाणी बाहेर येत आग लागण्याचा धोका कमी होतो. या स्प्रे मध्ये 1 लीटर पर्यंतचे पाणी ठेवण्याची क्षमता आहे. याची किंमत 500-800 रुपयांदरम्यान आहे.(Old Car Selling Tips: जुनी गाडी विकताना 'या' गोष्टी जरुर लक्षात ठेवा, मिळेल उत्तम किंमत)
तसेच कार फायर अलार्म हा एखाद्या रुममध्ये लावण्यात आलेल्या फायर अलार्म सारखा काम करतो. जर कारमध्ये आग लागल्यास हा अलार्म जोरात वाजवू लागतो. जेणेकरुन तुम्ही अलर्ट होऊ शकता. याची किंमत 800-1500 रुपये आहे. अजून एक म्हणजे फायरप्रुफ स्प्रे खास पद्धतीच्या सॉल्यूशन पासून तयार केला जातो. त्यामुळे आग लागण्याची शक्यता कमी असते. हा स्प्रे जर तुम्ही कारमध्ये ठेवल्यास आग लागण्याची घटना घडल्यास त्याची तुम्हाला मदत घेता येईल. याची किंमत 800-2000 रुपयांपर्यंत आहे.