Old Car Selling Tips: जुनी गाडी विकताना 'या' गोष्टी जरुर लक्षात ठेवा, मिळेल उत्तम किंमत
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

जर तुम्ही फेस्टिव्ह सीझनमध्ये जुनी कार विकून नवी कार खरेदी करण्याचा विचार करत आहात? जर असे असल्यास जुनी कार विकून तुम्हाला त्याचे अधिक पैसे मिळण्याची शक्यता आहे पण तुम्ही काही गोष्टी लक्षात ठेवल्यास तरच हे शक्य आहे. जुनी कार विकण्यापूर्वी काही गोष्टी करणे फार महत्वाचे आहे. त्यामुळेच तुम्हाला विक्री केलेल्या जुन्या गाडीचे चांगले पैसे मिळू शकतील. तर जाणून घ्या या सोप्प्या टीप्स. जर तुम्हाला तुमची जुनी गाडी कितीला विकली जाऊ शकते हे माहिती नसल्यास अशा वेळी एखाद्या प्रोफेशनलची मदत घ्या. जो तुम्हाला कारची वॅल्यूएशन किती आहे ते सांगून त्याचे सेलिंग प्राइज बद्दल ही अधिक माहिती देईल. त्यानुसार तुम्ही जुनी गाडी किती रुपयांना विक्री करणार ते ठरवू शकता.

जुनी गाडी विक्री करताना काही पेपर वर्क करणे सुद्धा महत्वाचे आहे. Pollution Certificate ते कार इंन्शुरन्स पर्यंतच्या सर्व महत्वाच्या गोष्टी पूर्ण करणे गरजेचे आहे. कारण जेव्हा एखादा ग्राहक तुमची जुनी कार खरेदी करतो त्यावेळी तो कायद्याअंतर्गत त्या कारचा विचार करुनच ती घेतो. त्यामुळे पुढे जाऊन कोणतीही समस्या येऊ नये ही गोष्ट सुद्धा प्रत्येकाने लक्षात ठेवली पाहिजे.(Compact Suv खरेदी करण्याचा विचार करत असल्यास Nissan देणार Kicks वर भारी डिस्काउंट)

अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्याकडे कार सर्विसिंग संबंधित सर्व माहिती असल्यास त्याचे उत्तम रिटर्नस तुम्हाला मिळू शकतात. खरंतर असे का होते की, सेंकड हँन्ड कार ग्राहकांना कळून येण्यासह त्याच्या सर्विसिंगमुळे ती उत्तम अवस्थेत आहे की नाही ते सुद्धा समजते.(Motorcycle Care: सर्विसिंगच्या वेळी करण्यात आलेल्या 'या' चुकांमुळे कमी होते बाईकची मायलेज, जाणून घ्या अधिक)

जुनी कार विक्री करताना एकदम सोपी गोष्टी म्हणजे कारची अवस्था कशी आहे. कारण तुमची जुनी कार जेवढी चांगल्या अवस्थेत असेल तेवढीच अधिक किंमत समोरील ग्राहक तुम्हाला देईल. पण विक्री करण्यापूर्वी गाडीची डागडुजी करणे विसरु नका. गाडीचे इंटीरियर आणि एक्सटीरियर मध्ये काही समस्या असल्यास ती नीट करुन घ्या.