प्रातिनिधिक प्रतिमा

काही लोकांच्या अशा तक्रारी असतात की त्यांची बाईक उत्तम मायलेज देत नाही. कारण यामागे काही कारणे असून त्याबद्दल लोकांना माहिती नसतात. त्यामुळे आम्ही तुम्हाला याच कारणांबद्दल अधिक माहिती देणार आहोत. त्यामुळे तुम्हाला कळू शकणार आहे की तुमची बाईक का कमी मायलेज देत आहे. इंजिनचे ऑईल हे तुमच्या बाईकच्या इंजिनची गरज असुन ल्यूब्रिकेंट देते. यामुळे इंजिन त्याच्या पूर्ण क्षमतेनुसार काम करुन अधिक गरम होत नाही. परंतु काही नागरिक लोक पैसे वाचवण्यासाठी स्वस्त इंजिन ऑइल खरेदी करुन ते बाईकसाठी वापरतात. या कारणामुळे बाईकचे इंजिन चमकण्याऐवजी अधिक घर्षण झाल्याने ते गरम होते. तसेच बाईकला सुद्धा अधिक पेट्रोल लागते.

काही वेळेस लोक त्यांच्या बाईकच्या अतिरिक्त भागात ग्रीसिंग करणे विसरुन जातात. यामुळे बाईकच्या चैनसह अन्य भागात जंग लागते. जंगच्या कारणास्तव बाईकची चेन खुप घट्ट होऊन त्याचा इंजिनवर परिणाम होतो.(Car Safety Features: ABS ते TPMS पर्यंत 'या' 4 उत्तम सेफ्टी फिचर्स शिवाय नवी कार खरेदी करु नका)

सर्विंसिंगच्या वेळी जर बाईकच्या एअर फिल्टरकडे दुर्लक्ष केल्यास त्याच्या बाईकचे मायलेज कमी होणार आहे. खरंतर एअर फिल्टरचे काम बाईकच्या इंजिनमध्ये स्वच्छ हवा पोहचवण्याचे असते. त्यामुळे बाईकचे इंजिन उत्तमपणे काम करु शकते. परंतु ते जर साफ न केल्यास त्यात स्वच्छ हवा पोहचू शकत नाही. या कारणामुळे सुद्धा बाईकचे मायलेज ही कमी होऊ शकते.(Monsoon Tips for Car: पावसात कार चालविण्यापूर्वी 'या' गोष्टींकडे चुकूनही करु नका दुर्लक्ष)

स्पार्क प्लग जर काही काळाने जुना झाल्यास त्यावर कार्बनचा एक थर जमा होतो. तर बाईक स्टार्ट करण्यासाठी वेळ लागतो. परिणामी पेट्रोलटा खर्च सुद्धा वाढतो. तसेच बाईक स्टार्ट करताना ती वारंवार बंद पडते. यामुळे बाईकच्या जरुरी पार्ट्सची सर्विंसिंग करताना अत्यावश्यक काळजी घेणे गरजेचे आहे.