Car Safety Features: ABS ते TPMS पर्यंत 'या' 4 उत्तम सेफ्टी फिचर्स शिवाय नवी कार खरेदी करु नका
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

सध्याच्या काळात बाजारात विविध कंपन्यांच्या कार लॉन्चिंग मोठ्या प्रमाणात करण्यात आले आहे. तसेच कार निर्मात्या कंपन्यांनी त्यांच्या ग्राहकांना उत्तम Safety Features देण्याचा सुद्धा प्रयत्न करत आहेत. त्यामुले ड्रायव्हरसह प्रवाश्याला सुद्धा प्रवासावेळी सुरक्षित वाटेल. बहुतांश कारमध्ये देण्यात आलेले सेफ्टी फिचर्स हे एकसारखेच असतात. पण काही असे फिचर्स आहेत जे फक्त प्रीमियम कारसाठीच दिले जातात. अशा पद्धतीचे फिचर्स ड्रायव्हगिंच्या वेळी एखाद्या मुश्किल परिस्थितीवेळी सुद्धा सुरक्षिततेचा अनुभव देऊन जातात. त्यामुळे जर तुम्ही सणाच्या दिवसात एखादी नवी कार खरेदी करण्याचा विचार करत असल्यास तर आम्ही तुम्हाला खरेदी पूर्वी फिचर्स बद्दल अधिक माहिती देणार आहोत.

कोणतीही गाडी खरेदी करताना त्यामध्ये एअरबॅग्स असणे फार महत्वाचे आहे. कारण एखादी दुर्घटना झाल्यास त्या अॅक्टिव्ह होऊन चालकासह प्रवाश्याला दुखापती पासून बचाव करतात. अपघात झाल्यास एअरबॅग्स अवघ्या काही सेकंदात खुल्या होत गाडीमधील व्यक्तीची सुरक्षितता करतात. भारतात जेवढ्या सुद्धा कार उपलब्ध आहेत त्या सर्वांमझ्ये एअरबॅग्स स्टँडर्ड फिचर्सच्या रुपात दिल्या जातात.(Renault Duster टर्बो पेट्रोल मॉडेल भारतात लॉन्च, किंमत 10.49 लाखांपासून सुरु)

बाजारात यापूर्वी पासून जेवढ्या सुद्धा कार उपलब्ध होत्या त्या सर्वांमध्ये अँन्टी लॉकिंग ब्रेकिंग सिस्टम दिली जात होती. त्याचसोबत आता सुद्धा लॉन्चिंग करण्यात आलेल्या प्रत्येक गाडीमध्ये ABS दिले जाते. एबीएस सिस्टिम हे असे सेंसर पेक्षा लैस आहे जो तुमच्या गाडीचा स्पीड, ब्रेकवर लावण्यात आलेला जोर सारख्या गोष्टींना मॉनिटर करतो. काही वेळेस असे होते की, जेव्हा अचानक ब्रेक लावल्यास एबीएस अॅक्टिव्ह होऊन गाडीच्या वेगावर सुद्धा नियंत्रण मिळवले जाते. त्याचसोबत निसरड्या रस्त्यांवर आणि दळणावळणाच्या रस्त्यांवर सुद्धा तुम्हाला सुरक्षितता जाणवून देते.

2012 नंतर तयार करण्यात आलेल्या सर्व कारमध्ये इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल सिस्टम दिले जात आहे. हे सिस्टिम कारची स्लाइडिंग आणि स्किडिंग थांबवते. गाडी थांबवण्यासाठी सेंसरचा उपयोग केला जातो. हे सेंसर व्हिल स्पीड, साइडवेज मोशन आणि रोटेशन सारख्या गोष्टी मॉनिटर करतात. त्याचसोबत जर चालक अनस्टेबल होऊन गाडी चालवत असल्यास इलेक्ट्रिक स्टेबिलिटी कंट्रोल कारला पूर्णपणे स्टेबल ठेवण्यास मदत करते. हे सिस्टिम कारच्या टायरला मॉनिटर करुन ड्रायव्हरला कार चालवण्याची सवलत देतो.(Kia Sonet ची प्री-बुकिंग आजपासून सुरु, मोजावे लागणार केवळ 25,000 रुपये)

सध्या सुद्धा कारच्या टायरमध्ये प्रेशर मॉनिटरिंग सिस्टिम दिले जात नाही. परंतु ज्या कारमध्ये ही सिस्टिम दिली आहे त्यांच्यासाठी कार चालवणे सोपे आहे. यामागील कारण म्हणजे टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टिम तुमच्या कारच्या टायरच्या प्रेशरवर लक्ष ठेवते. काही वेळेस असे होते की, तुम्ही स्पीडमध्ये गाडी चालवतानाच टायर फुटला जातो. यामुळे तुमचा अपघात होऊ शकते. परंतु टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टिममुळे तुम्हाला आधीच कळते की, टायरमधील हवेचे प्रमाण कमी आहे. अशा वेळी तुम्ही टारमध्ये हवा भरु शकता. ही सिस्टिम कारमध्ये असे अतिवाश्यक असून बहुतांश प्रीमियम कार या सिस्टिम पेक्षा लैस आहेत.