Kia Sonet ची प्री-बुकिंग आजपासून सुरु, मोजावे लागणार केवळ 25,000 रुपये
Kia Sonet Representative (Photo Credits: Twitter)

कारप्रेमींसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी! किआ मोटर्स (Kia Motors) कंपनीची सप्टेंबरमध्ये भारतात लाँच होणारी छोट्या Sonet SUV ची प्री बुकिंग आजपासून सुरु झाली आहे. 4 मीटरपेक्षा छोटी असणा-या या एसयूव्हीच्या प्री बुकिंगसाठी तुम्हाला केवळ 25,000 रुपये मोजावे लागणार आहे. सप्टेंबर 2020 मध्ये ही बारतीय बाजारात लाँच केली जाईल. किआ सोनेटच्या लाँचिंगच्या आधीच कंपनीने आजपासून म्हणजेच 20 ऑगस्टपासून याची प्री बुकिंग सुरु केली आहे. त्यामुळे इच्छुकांनी या कंपनीच्या अधिकृत साइटवर अथवा किआ मोटर्सच्या डीलरशिपमध्ये याची प्री-बुकिंग करु शकता.

किआ सोनेटच्या या एसयुव्हीमध्ये जबरदस्त फिचर्स देण्यात आले आहे. सॉनेट GT Line आणि Tech Line असे दोन ट्रमी पर्याय देण्यात आले आहेत. सॉनेट मध्ये वेंटिलेटेड सीट्स, बॉश सराउंड ऑडियो सिस्टम, स्मार्टफोन कनेक्टिव्हिटीसह 10.25 इंच HD टचस्क्रीन देण्यात आली आहे. त्यासोबतच वायरस प्रोटेक्शनसह इंटीग्रेटेड एयर प्यूरीफायर, एंबिएंट लाइटिंग, कूलिंग फंक्शन सुद्धा देण्यात आले आहेत. तसेच मोबाइल फोनसाठी वायरलेस चार्जिंगसारखे क्लास-लीडिंग फीचर्ससुद्धा असतील. बहुप्रतिक्षित Kia Sonet Compact SUV कार अखेर भारतात लाँच; याचे शानदार फीचर्स पाहून तुम्हीही व्हाल थक्क

Kia Sonet SUV 57 पेक्षा जास्त कनेक्टिव्हिटी फिचर्स देण्यात आले आहेत. त्यासोबतच यात UVO कनेक्ट टेक्नोलॉजीसुद्धा असेल. यात वॉइस असिस्ट आणि मॅप्ससाठी ओवर-द-एयर अपडेट्स मिळतील. किआ सॉनेट चे प्लॅटफॉर्म आणि इंजन ऑप्शंस हुंदाई वेन्यू सारखे आहेत. सॉनेट 4 इंजन ऑप्शंस मध्ये येऊ शकते.

सॉनेट मध्ये 7 स्पीड ड्यूल-क्लच ऑटोमॅटिक, 6 स्पीड मॅन्युअल, 6 स्पीड ऑटोमॅटिक आणि इंटेलीजेंट मॅन्युअल ट्रांसमिशन (iMT) ऑप्शन असू शकतात. किआ सॉनेट ची किंमत 7 लाख ते 12 लाखादरम्यान असू शकते.