किआ मोटर्सचा (Kia Motors) गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चेत असलेली बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित Kia Sonet Compact SUV कार अखेर आज भारतात लाँच झाली आहे. किआ कंपनीच्या या कारची सर्वजण आतुरतेने वाट पाहात होते. किआ कंपनीची ही तिसरी कार असून ही 4 प्रकारात लाँच करण्यात आली आहे. या कारची किंमत 7 ते 12 लाखांच्या दरम्यान आहे. या किंमतीत या कारमध्ये देण्यात आलेले फिचर्स डोळे चक्रावून टाकणारे आहेत. ही कार आंध्र प्रदेशच्या अनंतपुर प्लांटमध्ये बनविण्यात आली आहे.
या कारमध्ये 10.25 इंचाची टचस्क्रीन इंफोटेंटमेंट देण्यात आले आहे. त्याशिवाय यात Bose चे 7 स्पीकर सिस्टम, इलेक्ट्रिक सनरुफ, फ्रंट वेंटिलेटेड सीट्स देण्यात आली आहे. याला स्मार्टवॉटनेसुद्धा कनेक्ट करु शकता. Kia Seltos ची इलेक्ट्रॉनिक कार लवकरच होणार लॉन्च, जाणून घ्या अधिक
याच्या इंजिनविषयी बोलायचे झाले तर यात 3 इंजिनचे पर्याय दिले आहेत. त्याशिवाय यात 5 स्पीड मॅन्युअल, 6 स्पीड मॅन्युअल, 6 स्पीड AT आणि 6 स्पीड iMT पर्याय दिले आहेत. किआ सॉनेट GT लाईनला 1.0 लीटर पेट्रोल इंजिन आणि 1.5 लीटर टर्बो डीझेल इंजिन वेरियंट्स मिळतील.
तसेच या कारमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने 6 एअरबॅग, ABS चे EBD, फ्रंट आणि रियर पार्किंग सेंसर, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम (TPMS), इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल (ESC), हिस असिस्ट कंट्रोल (HAC) सारखे आधुनिक फीचर्स दिले आहेत.