Kia Seltos ची इलेक्ट्रॉनिक कार लवकरच होणार लॉन्च, जाणून घ्या अधिक 
Kia Seltos (Photo Credits-Twitter)

Kia Motors ची सेल्टॉस एसयुव्ही भारतीय बाजारात पॉप्युलर आहे. आता कंपनी Kia Seltos चे इलेक्ट्रॉनिक मॉडेल लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. लीक झालेल्या रिपोर्टमध्ये Seltos EV संबंधित काही माहिती समोर आली आहे. रिपोर्टनुसार असे सांगण्यात आले आहे की, Kia Seltos EV सर्वप्रथम चीन येथे लॉन्च करण्यात येणार आहे. तेथील बाजारात या वर्षाच्या दुसऱ्या सहा महिन्यात उतरवण्यात येणार आहे. चीन मध्ये इलेक्ट्रिक सेल्टॉसचे नेक्स्ट जनरेशन Kia KX3 EV च्या रुपात लॉन्चिंग करण्यात येणार आहे.

Kia KX3 EV मध्ये 45.2 kWh लिथियम- आयन बॅटरी पॅक देण्यात येणार आहे. ही कार एकदा फुल्ल चार्ज झाल्यानंतर 300 किमी पर्यंत चालवता येणार आहे. यामध्ये देण्यात आलेली इलेक्ट्रिक मोटर 111 PS ची पॉवर आणि 285 Nm चे टॉर्क जनरेट करणार आहे. याची टॉप स्पीड 150 किमी प्रति तास आहे. रिपोर्ट्स मध्ये पुढे असे ही सांगण्यात आले आहे की, नेक्स्ट जनरेशन Kia KX3 दोन वेरियंटमध्ये बाजारात उपलब्ध करुन देण्यात येणारआहे. मात्र अद्याप या कारच्या मोटर्स आणि बॅटरी पॅक संबंधित अधिक माहिती समोर आलेली नाही.  परंतु यामध्ये इलेक्ट्रिक पॉवरट्रेन Kia Soul EV किंवा Hyundai Kona EV मधून घेतला जाणार आहे. Soul EV दोन वेरियंट म्हणजेच एक मिड रेंज आणि दुसरी लॉंन्ग रेंज मध्ये येणार आहे. मिड रेंज मधील कार एकदा फुल्ल चार्ज केल्यास 277 किमी तर लॉन्ग रेंज मधील वेरियंट 425 किमी पर्यंत धावणार आहे.(Honda कंपनीच्या 'या' दोन गाड्यांवर ग्राहकांना मिळणार तब्बल 1 लाख रुपयांची सूट)

इलेक्ट्रिक सेल्टॉस याचे प्रोडक्शन ऑगस्ट महिन्यात सुरु गोणार आहे. कंपनी प्रत्येक वर्षाला 10 हजार सेल्टॉस ईव्ही बनवणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मात्र अद्याप भारतात लॉन्च करण्याबाबत कंपनीने विचार केलेला नाही. जर भारतात ही कार लॉन्च केल्यास ती मार्केटमध्ये ह्युंदाई याला टक्कर देणारी ठरणार आहे. भारतात लवकरच किआची सब-कॉम्पेक्ट एसयुव्ही येणार आहे. ही कार ऑक्टोंबर दरम्यान लॉन्च करण्यात येण्याची शक्यता आहे.