Renault Duster टर्बो पेट्रोल मॉडेल भारतात लॉन्च, किंमत 10.49 लाखांपासून सुरु
Renault Duster Turbo Petrol Model (Photo Credits-Twitter)

फ्रान्सची वाहन निर्माता कंपनी रेनो यांनी भारतात त्यांची लोकप्रिय एसयुव्ही Duster चे टर्बो चार्जड पेट्रोल वर्जन लॉन्च केले आहे. शानदार डिझाइन आणि दमदार पॉवरपेक्षा लेस असलेल्या या कारची सुरुवाती किंमत 10.49 लाख ते 13.58 लाख रुपये आहे. तर डस्टरच्या टर्बो मॉडेलसह ही कार आपल्या सेगमेंट मधील सर्वात दमदार कॉम्पैक्ट एसयुवी बनली आहे.नव्या रेनो डस्टरला पॉवर देण्यासाठी 1.3 लीटर चार सिलेंडर युक्त टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिनचा प्रयोग केला आहे. जो 153bhp ची पॉवर आणि 254Nm चा पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. ट्रान्समिशनसाठी इंजिनसह 6 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स सुद्धा दिला आहे. तर X-tronic सीवीटी ट्रान्समिशन हे ऑप्शन म्हणून ठेवले आहे.

2020 रेनो डस्टर 1.3 लीटर टर्बो पेट्रोल मॉडेलमध्ये तीन मॅन्युअल ट्रिम्स आणि दोन सीवीटी ट्रिम्समध्ये उतरवली जाणार आहे. माहितीसाठी लक्षात असू द्या की, हे ते इंजिन आहे जे 2020 निसान किक्स ड्युटी करते. परंतु कंपनीच्या या नव्या मॉडेलसह BS6 कंम्प्लाइंट 1.5 लीटर पेट्रोल इंजिनची विक्री सुद्धा सुरु ठेवणार आहे. जी 104bhp ची पॉवर आणि 142Nm पीक टॉर्क जनरेट करणार आहे.(Honda Amaze ठरली सर्वाधिक विक्री करण्यात आलेली कार, सुरुवाती किंमत 6.17 लाख रुपये)

कारच्या इंटिरियर बद्दल बोलायचे झाल्यास डस्टर 1.3 टर्बो पेट्रोलचे केबिन हे 2020 डस्टर सारखेच आहे. याची अपहोल्स्ट्रीवर आता लाल रंग दिला आहे. त्याचसोबत यामध्ये अॅपल कारप्ले आणि अॅन्ड्रॉइड ऑटोसह नवा 8 इंचाचा टचस्क्रिन डिस्प्ले, पूर्णपणे ऑटो क्लायमेट कंन्ट्रोल, कुल ग्लोवबॉक्स, ईबीडी, ड्रायव्हर आमि प्रवासी एअरबॅग्स, रियर पार्किंग सेंसर, सीट बेल्ट रिमांडर आणि मानकच्या रुपात स्पीड अलर्ट, रिव्हर्स पार्किंग कॅमेरा, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी आणि हिल स्टार्ट सारखे फिचर्स दिले आहेत.(MG Hector Plus SUV भारतात लॉन्च, जाणून याची वैशिष्ट्ये आणि किंमतीविषयी)

डस्टरमध्ये येणारे 17 इंचाचे एलॉय व्हिलला सध्याच्या मॉडेलपासून वेगळे करण्यासाठी लाल डस्टरचा लोगो दिला आहे. नव्या कारमध्ये रेनोने ग्रिल, फॉगलॅम्प्स, अपहोल्स्ट्री रुफ रेलवर डस्टरचा लोगो आणि टेलगेटवर लाल रंगाचे डस्टर लेटरिंग दिले आहे. त्याचसोबत एलईडी टेललाइट्स, बिफियर बंपरसोबत डीआरएलसह प्रोजेक्टर हेडलाइट्स मध्ये कोणताच बदल करण्यात आलेला नाही.