MG Hector Plus SUV (Photo Credits: AutoNexa.com)

MG Motor India ने आपली 6 सीटर SUV Hector Plus लाँच केली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून SUV चे चाहते या गाडीची आतुरतेने वाट पाहात होते. हेक्टर प्लस चार प्रकारात भारतात लाँच करण्यात आली आहे. ज्यात Style, Super, Smart आणि Sharp यांचा समावेश आहे. या कारचे मॉडल देखील फार हटके आणि स्टायलिश बनविण्यात आले आहे. आधीच्या 5 सीटरमध्ये थोडे बदल करुन ही नवीन कार बनविण्यात आली आहे. याचे आणखी एक खास वैशिष्ट्य म्हणजे यात 3 लाईनमध्ये 6 सीट्स देण्यात आले आहेत.

या कारच्या डिझाईनविषयी बोलायचे झाले तर, यात 3 लाईनपैकी दुस-या लाईनमध्ये कॅप्टन सीट देण्यात आली आहे. त्यासोबतच स्लाइड आणि रेक्लाइन फंक्शन दिले आहेत. तसेच यातील सीट्स सीपिया लेदर सीट्स, लेदर फिनिश स्टीयरिंग व्हिल, फ्रंट आणि रियर रीडिंग लाइट्स, 8 कलर एम्बिएंट लायटिंग आणि 7 इंचाची मल्टी इन्फर्मेश डिस्प्ले देण्यात आली आहे.

हेदेखील वाचा- MG Gloster SUV लवकरच होणार लॉन्च, जाणून घ्या खासियत

याच्या इंजिनविषयी बोलायचे झाले तर, यात 1.5 लीटर पेट्रोल, 1.5 लीटर पेट्रोल हायब्रिड आणि 2 लीटर डिझेल इंजिन यांचा समावेश करण्यात आला आहे. दोन्ही पेट्रोल इंजिन 143 PS पॉवर आणि 250Nm टॉर्क जनरेट करतो. तर डिझेल इंजिन 170 PS ची पॉवर आणि 350 Nm टॉर्क जनरेट करतो. तिन्ही इंजिनसह 6 स्पीड मॅन्युअल गियरबॉक्स स्टँडर्ड दिला गेला आहे.

याच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, MG Hector Plus SUV मध्ये अॅडजेस्टेबल ड्रायवर सीट, पावर्ड टेलगेट ओपनिंग, स्मार्ट स्वाइप ऑटो टेलगेट ओपनिंग, हीटेड आउट साइड रियर व्यू मिरर्स, ड्यूल-पैन पैनोरमिक सनरूफ, रेन सेंसिंग वाइपर्स, ऑटो हेडलैम्प्स, ऐंड्रॉयड ऑटो आणि ऐपल कारप्ले के साथ 10.4-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आणि इन्फिनिटी प्रीमियम साउंड सिस्टम सारखे फीचर्स देण्यात आले आहेत.

MG Hector Plus SUV ची किंमत 13.49 लाखांपासून 18.21 लाखांच्या दरम्यान आहे. डीजल मॉडलची किंमत 14.44 लाख ते 18.54 लाखांदरम्यान आहे.

सेफ्टीसाठी यात 6-एयरबैग, एबीएस, ईबीडी, ब्रेक असिस्ट, ईएसपी, ट्रैक्शन कंट्रोल सिस्टम, 360 डिग्री पार्किंग कैमरा, फ्रंट व रियर पार्किंग सेंसर्स, इलेक्ट्रिक पार्किंग ब्रेक, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम आणि हिल-होल्ड कंट्रोल सारखे सेफ्टी फिचर देण्यात आले आहेत.