MG Gloster SUV लवकरच होणार लॉन्च, जाणून घ्या खासियत
MG Gloster SUV (Photo Credits-Twitter)

MG Gloster SUV भारतीय बाजाराती ल MG Motor ची बहुप्रतिक्षित कारपैकी एक आहे. या प्रिमियम एसयुवीला फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या ऑटो एक्सपो मध्ये प्रदर्शित करण्यात आली होती. आता कंपनीने MG Gloster SUV ला अधिकृतपणे त्यांच्या वेबसाईट्सवर झळकवली आहे. याच्या लॉन्चिंग बाबत तारीख अद्याप स्पष्ट केली नाही आहे. मात्र लवकरच भारतात लॉन्च होण्याची चर्चा आहे.(Kia Seltos ची इलेक्ट्रॉनिक कार लवकरच होणार लॉन्च, जाणून घ्या अधिक)

एमजी मोटर इंडिया यांच्या वेबसाईटवर लवकरच शानदार एमजी ग्लॉस्टर टॅगलाईनसह ग्लॉस्टर एसयुवीच्या मॉडेलबद्दल टीझरचा फोटो झळकावला आहे. ग्लॉस्टर भारतीय बाजारात एमजी यांची चौथी कार आहे. ही एमजी मोटर इंडियाच्या प्रॉडक्ट लाइनअप मधील सर्वात टॉप मॉडेल आहे. इंडियन मार्केट मध्ये ग्लॉस्टरची टक्कर टोयोटा फॉर्च्युनर, फोर्ड अॅन्डेवर आणि महिंद्रा अल्टूरस जी4 सोबत असणार आहे.

एमजी ग्लॉस्टरला बोल्ड लूक देण्यात आला आहे. यामध्ये मोठी क्रोम-फिनिश ग्रिल, एलईडी हेडलाइट्स, फॉग लॅम्प्स, सिलव्हर फ्रंट स्किड प्लेट्स, 6 स्पोक अलॉय वील्ज, विंडो लाइनवर क्रोम स्ट्रिप्स, रुफ स्पॉइलर, ग्लॉसी ब्लॅक रियर डिफ्युजर आणि क्वॉड एग्जॉस्ट देण्यात आले आहेत. ग्लॉस्टर या कारची लांबी 5005mm, रुंदी 1932mm आणि उंची 1875mm आहे. एसयुवीसाठी व्हिलबेस 1950mm देण्यात आला आहे.(Mahindra कंपनी घेऊन येणार 2 नव्या शानदार SUV, जाणून घ्या अधिक)

या कारच्या अन्य फिचर्सबाबत बोलायचे झाल्यास यामध्ये 12.3 इंचाचा टचस्क्रिन इन्फोटेनमेंट सिस्टिम, अॅम्बिएंट लाईटिंग,3 झोन ऑटोमेटिक क्लायमेट कंट्रोल आणि 8 इंचाचा MID देण्यात येण्याची शक्यता आहे. याच्या फ्रंट सीट्साठी वेंटिलेशन आणि मसाज फंक्शन सुद्धा दिले जाऊ शकतात. एमजी यांनी भारतीय बाजारात येणारी ग्लॉस्टर एसयुवी बद्दल मेकॅनिकल डिटेल्स संदर्भात खुलासा केलेला नाही.