निस्सान किक्स SUV

निसान (Nissan) कंपनी त्यांची लोकप्रिय Compact Suv Nissan Kicks च्या खरेदीवर आकर्षक ऑफर देत आहे. जर तुम्ही 15 सप्टेंबर पूक्वी Kicks खरेदी करण्याचा विचार करत असल्यास ऑफरचा लाभ तुम्हाला घेता येणार आहे. तर आम्ही तुम्हाला निसानची कॉम्पैक्ट एसयुवी वर देण्यात येणाऱ्या डिस्काउंटसह त्याचे फिचर्स, फायदे आणि स्पेसिफिकेशन बद्दल माहिती देणाक आहोत.(Honda कंपनीच्या प्रीमियम सेडानवर दिला जातोय 2.50 लाखांचा कॅश डिस्काउंट, जाणून घ्या खासियत)

 पॉवर आणि स्पेसिफिकेन प्रकरणी Nissan Kicks मध्ये पहिले 1.5 लीटरचे 4 सिलेंडर असणारे पेट्रोल इंजिन दिले आहे. जे 5600Rpm वर 105 Hp ची पॉवर आणि 400 Rpm वर 142Nm चा टॉर्क जनरेट करु शकतात. ट्रान्समिशनसाठी इंजिन 5 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स लैस आहे. या कॉम्पैक्ट एसयुवी मध्ये दुसरा 1.3 लीटरचे असणारा इंजिन असून तो 5500 Rpm वर 154 Hp ची पॉवर आणि 1600 Rpm वर 254 Nm चा टॉर्क जनरेट करणार आहे. ट्रान्समिशनसाठी इंजिन 6 स्पीड मॅन्युअल आणि 7 स्टेप सीवीटी ऑटोमेटिक ट्रान्समिशन ऑप्शनमध्ये येणार आहे.

कारच्या डायमेंशन बद्दल माहिती द्यायची झाल्यास, याची लांबी 4384 mm, उंची 1669 mm, व्हिलबेस 2673 mm, फ्यूल टँक कॅपेसिटी 50 लीटर, मिनिमम टर्निंग रेडिएस 52 मीटर, ग्राउंड क्लीअरेंस 210 mm आणि बूट स्पेस 400 लीटर दिला आहे. ब्रेकिंग सिस्टिमसाठी याचा पुढील बाजूल डिस्क ब्रेक आणि रियरमध्ये ड्रम ब्रेक दिला आहे. तसेच सस्पेंशनसाठी पुढील बाजूला क्वाइल स्प्रिंगसह मॅकफर्शन स्ट्रट, स्टेबलाइजर बार आणि डबल अॅक्शन अॅक्टिंग शॉक अॅब्स्रॉबर सस्पेंशन दिले आहे. रियरमध्ये क्वाइल स्प्रिंगसह टोर्शियन बीम आणि डबल अॅक्टिंग शॉक अॅब्स्रॉबर सस्पेंशन दिले आहे.(Nexon XM(S) वेरियंट भारतात लॉन्च, खरेदीपूर्वी जाणून घ्या किंमतीसह फिचर्स)

निसानच्या या कारच्या ऑफर बद्दल बोलायचे झाल्यास, Nissan Kicks च्या खरेदीवर कंपनीकडून 75 हजार रुपयांचा अतिरिक्त फायदा होणार आहे. ही कॉम्पैक्ट एसयुवी 15 सप्टेंबर पर्यंत बुकिंग केल्यास त्यावर 15 हजार रुपयांपर्यंत फायदा होणार आहे. कार एक्सचेंज केल्यास 40 हजार रुपयांपर्यंत ही फायदा होणार आहे. लॉटल्टी ऑफर अंतर्गत 10 हजार आणि कॉर्पोरेट ऑफर अंतर्गत 10 हजार रुयांचा फायदा होणार आहे. या कारची सुरुवाती किंमत 9,49,990 रुपये आहे.