Honda कंपनीच्या प्रीमियम सेडानवर दिला जातोय 2.50 लाखांचा कॅश डिस्काउंट, जाणून घ्या खासियत
Honda (Photo Credits-twitter)

Honda Cars India त्यांची प्रीमियम कार भारतात पॉप्युलर आहे. यामधीलच एक कार Honda Civic ही ग्राहकांच्या फारच पसंदीस पडली आहे. तर आता कंपनीकडून या कारवर बंपर कॅश डिस्काउंट दिला जात आहे. याचा फायदा ग्राहकांना नक्कीच होणार असून ज्यांना नवी कार खरेदी करायची आहे त्यांच्यासाठी सुद्धा ही सुवर्ण संधी आहे. त्यामुळे जाणून घ्या या कारवर कंपनीकडून किती डिस्काउंट दिला जात असून याची खासियत काय आहे.(24.7 kmpl मायलेज देणारी Honda कंपनीच्या 'या' कारवर दिली जातेय जबरदस्त डिस्काउंट, जाणून घ्या अधिक)

कारच्या इंजिन आणि पॉवर बद्दल बोलायचे झाल्यास होंडा सिविक मध्ये BS6 कंम्प्लायंट 1.6 लीटरचे i-DTEC डिझेल दिले आहे. जो 4000 Rpm वर 118Hp ची पॉवर आणि 2000Rpm वर 300Nm चे टॉर्क जनरेट करणार आहे. यामुळे कारला जबरदस्त मजबूती मिळते. हे इंजिन 6 स्पीड

मॅन्युअल ट्रान्समिशन लेस आहे. Honda Civic ARAI सर्टिफाइड 23.9 kmpl चे मायलेज देऊ शकते. या कारमध्ये पेट्रोल इंजिनचे सुद्धा ऑप्शन दिले गेले आहे.

एक्सटीरियर बद्दल सांगायचे झाल्यास, कारमध्ये स्पोर्टी डिझाइन फ्रंट क्रोमग्रिल, सिग्नेचर एलईडी हेडलाइट्स, एलईडी डे-टाइम रनिंग लाइट्स आणि युनिक साइजचे एलईडी टेल लॅप्स सारखे फिचर्स दिले आहेत. अन्य फिचर्ससाठी कारमध्ये 17.7 सेमी टचस्क्रिन इंफोन्टेनमेंट सिस्टिम, इलेक्ट्रिक सनरुफ, पुश स्टार्ट सिस्टिम सह स्मार्ट एन्ट्री, डुअल-झोन ऑटोमेटिक क्लायमेट कंट्रोल, 8 वे पॉवर ड्रायवर सीट, इलेक्ट्रिक पार्किंग ब्रेक आणि मल्टी अँगल रियर व्यू कॅमेरा सारखे फिचर्स उपलब्ध करुन दिले गेले आहेत.(Honda Hornet 2.0 भारतात लॉन्च, दमदार पॉवरसह मिळणार 'हे' खास फिचर्स)

सेफ्टी फिचर्ससाठी कारमध्ये 6 एअरबॅग्स, व्हिकल्स स्टेबिलिटी असिस्ट, हिल स्टार्ट असिस्टंट, होंडा लेन वॉच, ईबीडीसह एबीएस, ब्रेक असिस्ट सारखे सेफ्टी फिचर्सचा समावेश आहे. ऑफर बद्दल बोलायचे झाल्यास Honda Civic वर कंपनीकडून 2.50 लाखांपर्यंत कॅशबॅक डिस्काउंट ऑफर केला जात आहे. ही माहिती कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर सुद्धा दिली आहे. या कारची किंमत 20.74 लाख रुपये आहे.