24.7 kmpl मायलेज देणारी Honda कंपनीच्या 'या' कारवर दिली जातेय जबरदस्त डिस्काउंट, जाणून घ्या अधिक
Honda Amaze (Photo Credits-Twitter)

कार निर्माता कंपनी होंडा (Honda) सध्या भारतीय बाजारात Honda Amaze च्या खरेदीवर ग्राहकांसाठी दमदार ऑफर्स देत आहे. त्यामुळे जर तुम्ही होंडाची अमेझ (Honda Amaze) खरेदी करण्याचा विचार करत असल्यास ही तुमच्यासाठी उत्तम संधी ठरु शकते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला होंडाच्या अमेझ मॉडेलवरील डिस्काउंटसह त्याच्या अन्य फिचर्सबद्दल सुद्धा अधिक माहिती देणार आहोत. (Hyundai-Kia Car Recall: ह्युंदाई आणि किआ कार्समध्ये आग लागण्याचा धोका, कंपनीने परत मागवल्या 6 लाखांहून अधिक गाड्या, जाणून घ्या कुठे व कधी सुरु होईल रिकॉल)

होंडा कंपनीच्या अमेझ कारच्या ऑफर बद्दल बोलायचे झाल्यास याचा खरेदीवर 27,000 रुपयांची बचत केली जाऊ शकते. होंडा अमेझच्या पेट्रोल/डीझेलच्या सर्व BS6 ग्रेड्सवर किंवा जुन्यासह नव्या कारसोबत एक्सचेंज करुन खरेदी करत असल्यास 12 हजार रुपयांच्या किंमती पर्यंत एक्सटेंड वॉरंटी दिली जाणार आहे. कार एक्सचेंज केल्यास 15 हजार रुपयापर्यंत अतिरिक्त डिस्काउंट दिला जाणार आहे. त्याचसोबत जर तुम्ही जुन्या किंवा सध्याची कार एक्सचेंज न केल्यास त्यावर 12 हजार रुपयांपर्यंत एक्सटेंड वॉरंटी मिळणार आहे. या व्यतिरिक्त 3 हजार रुपयांपर्यंत कॅश डिस्काउंट मिळणार आहे. किंमतीबद्दल सांगायचे झाल्यास Honda Amaze ची सुरुवाती एक्स शो रुम किंमत 6,17,000 रुपये आहे. (Honda Hornet 2.0 भारतात लॉन्च, दमदार पॉवरसह मिळणार 'हे' खास फिचर्स)

पॉवर आणि स्पेसिफिकेशन बद्दल अधिक सांगायचे झाल्यास होंडा अमेझच्या BS6 मध्ये 1199cc चे पेट्रोल इंजिन दिले जाणार आहे. जे 6000 Rpm वर 90Ps ची पॉवर आणि 4800 Rpm वर 110 Nm टॉर्क जनरेट करु शकणार आहे. तर मायलेजच्या संदर्भात कंपनीच्या अधिकृत साइट नुसार, Honda Amaze पेट्रोल मध्ये 18.6 kmpl चा मायलेज आणि डिझेल मध्ये 24.7 kmpl चे मायलेज देऊ शकते. डायमेंशनच्या प्रकरणी Amaze ची लांबी 3995mm, रुंदी 1695 mm, उंची 1501mm, व्हिलबेस 2470mm, बूट स्पेस 420mm लीटर आणि फ्यूल टँक कॅपासिटी 35 लीटर आहे.  सस्पेंशन प्रकरणी Amaze BS6 च्या फ्रंटला मॅकफर्शन स्ट्रट क्वाइल स्प्रिंग आणि रियरमध्ये टोर्शियन बीम क्वाइल स्प्रिंग सस्पेंशन दिले आहे.