Nexon XM(S) (Photo Credits-Twitter)

Tata Motors  ने बुधवारी 8.36 लाख रुपये किंमत असणारी Nexon XM(S) वेरियंट लॉन्च केली आहे. अधिकाधिक ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी कंपनीने ही खास कार लॉन्च केली आहे. या वेरियंटमध्ये ग्राहकांना प्रीमियम फिचर्स दिले जाणार आहेत. टाटा यांनी असे म्हटले की, नेक्सॉनची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी सध्याच्या किंमतीत अधिकाधिक सुविधा देण्यासाठी या वेरियंटला तयार करण्यात आले आहे. दरम्यान, Nexon XM(S) मध्ये इलेक्ट्रिक सनरुफ दिला जाणार आहे. ही कार ग्राहकांना प्रीमियम फिल करुन देते. ऐवढेच नाही तर कारमध्ये ऑटो हेडलाइट्स, रेन-सेसिंग वायपर आणि स्टिअरिंग माउंटेड कंट्रोल्स सुद्धा मिळणार आहेत.

नव्या आणि प्रीमियम फिचर्ससह Nexon XM(S) मध्ये पूर्वीसारख्या सुविधा म्हणजेच इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी प्रोग्राम, प्रोजेक्टर हेडलॅंम्पसह एलईडी डीआरएल, ड्रायवर आणि को-पॅसेंजर एअरबग, हिल होल्ड कंट्रोल, हरमन आणि मल्टी ड्राइव्ह मोड्सच्या माध्यमातून कनेक्टनॉट इंफोटेनमेंट सिस्टिम सारखे फिचर्स मिळणार आहेत. (महिंद्रा कंपनीची Bolero मॉडेल महागली, जाणून घ्या नवी किंमत)

टाटा मोटर्सचे हेड विविके श्रीवत्स यांनी असे म्हटले की, आम्ही नेक्सॉन एक्सएम (एस) च्या लॉन्चिंगची घोषणा करण्यास तयार आहोत. एक्सएस (एस) ही अशी एक कार आहे जी शानदार किंमतीत आमच्या ग्राहकांना इलेक्ट्रिक सनरुफ सारखे उत्तम फिचर्स उपलब्ध करुन देते. दरम्यान, Nexon पेट्रोल आणि डीझेल या दोन्हीसह मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन ऑप्शन उपलब्ध आहे. ही एक हायटेक कार असून जी ग्राहकांना जबरदस्त रिपस्पॉन्स देत आहे.