कार खरेदी करण्याचा विचार करत असल्यास 5 लाखांहून कमी किंमती मधील 'या' हॅचबॅक गाड्यांबद्दल जरुर जाणून घ्या
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

भारतात हॅचबॅक कार मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. या हॅचबॅक गाड्या हायटेक फिचर्ससह येतात. यामधील काही कारची किंमत 8-10 लाख रुपयांच्या दरम्यान आहे. जर तुम्ही स्वस्त हॅचबॅक कार खरेदी करण्याचा विचार करत असल्यास तुम्हाला भारतात उपलब्ध असणाऱ्या 4 सर्वात स्वस्त कार बद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. खासियत म्हणजे या कारची किंमत 5 लाखांहून कमी आहे.(Audi Q2 Booking: ऑडी ने सुरु केली सर्वात स्वस्त असलेल्या एसयवी क्यू2 ची बुकिंग, जाणून घ्या लॉन्चिंगबद्दल अधिक)

Maruti Suzuki Alto ही भारतात सर्वाधिक विक्री केल्या जाणाऱ्या कारपैकी एक आहे. इंजिन आणि पॉवर बद्दल बोलायचे झाल्यास यामध्ये 796cc चे 3 सिलेंडर इंजिन लावले आहेत. जे 6000rpm वर 47.3 Hp ची मॅक्सिमम पॉवर आणि 3500rpm वर 69Nm चा पीक टॉर्क जनरेट करणार आहे. ही कार 5 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन लैस आहे. जर मायलेज बद्दल सांगायचे झाल्यास मारुती सुजुकी ऑल्टो 1 लीटर पेट्रोलमध्ये संपूर्ण 22.05kmpl चे मायलेज देण्यास सक्षम आहे. जर CNG मॉडेलच संदर्भात माहिती द्यायची झाल्यास याचे मायलेज 31.59 km/kg आहे. Alto ला 2,94,800 रुपयांच्या किंमतीत खरेदी करता येणार आहे.

Maruti S-Presso या कारच्या इंजिन आणि पॉवर बद्दल सांगायचे झाल्यास त्यामध्ये कंपनीने 998cc चे 3 सिलेंडर K10 पेट्रोल इंजिन दिले आहे. हे इंजिन 5500 आरपीएमवर 6 बीएचपीचे मॅक्सिमम पॉवर आणि 3500 आरपीएमवर 90 न्यूटन मीटर पर्यंत पीक टॉर्क जनरेट करणार आहे. या कारमध्ये 5 स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमेटिक ट्रान्समिशन ऑप्शन मिळणार आहे. मायलेजसाठी मारुती एस प्रेसो 2 लीटर पेट्रोलमध्य 21.4 किमी मायलेज देणार आहे. ही कार तुम्हाला 3.7 लाख रुपयांत खरेदी करता येणार आहे.(MG Gloster SUV Unveiled In India: भारतातील पहिली ऑटोनॉमस प्रीमियम एसयुव्ही एमजी ग्लॉस्टर लॉंन्च; बुकिंग सुरू)

BS6 Datsun Go मध्ये इंजिन आणि पॉवर संदर्भात माहिती द्यायची झाल्यास 1.2 लीटर पेट्रोल इंजिन असून 75.94Hp ची मॅक्सिमम पॉवर आणि 104Nm चा टॉर्क जनरेट करणार आहे. ही कार 5 स्पीड मॅन्युअल आणि सीवीटी ट्रान्समिशन ऑप्शनसह उपलब्ध आहे. या कारमध्ये 19.0 kmpl आणि CVT मध्ये 19.59 kmpl देण्यास सक्षम आहे. याची किंमत 3.99 लाख रुपये आहे.

Renault Kwid BS6 साठी 1.0 लीटरचे 3 सिलेंडर, पेट्रोल इंजिन दिले आहे. जो 68bp ची मॅक्सिमम पॉवर आणि 91Nm चा पीक टॉर्क जनरेट करणार आहे. ही कार 21-22 किमी प्रति लीटर मायलेज देऊ शकते. याची सुरुवाती किंमत 2.92 लाख रुपये आहे.