Audi Q2 (Photo Credits-Twitter)

जर्मनीची वाहन निर्माता कंपनी ऑडी इंडिया (Audi India) यांनी भारतात आपली कॉम्पेक्ट एसयुवी ऑडी क्यू2 ची बुकिंग सुरु केली आहे. त्यामुळे जर ही कार तुम्हाला बुक करायची असल्यास ती डिलरशीप किंवा अधिकृत वेबसाईट येथुन बुकिंग करता येणार आहे. दरम्यान, गाडीची किंमत 2 लाख रुपये आहे. तर कंपनी येत्या काही दिवसात भारतात लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. ही कार ऑक्टोंबरच्या अखेर किंवा नोव्हेंबरच्या सुरुवातीला लॉन्च केली जाऊ शकते.(Tata कंपनी घेऊन येणार Mini SUV, टेस्टिंगच्या वेळी कारचा दिसला दमदार लूक)

ऑडी कंपनीची Q8, A8L, RS7, RSQ8 नंतर Q2 ही पाचवी कार असणार आहे. कार निर्मात्यांचे असे म्हणणे आहे की, ऑडी Q2 खासकरुन नेहमीच्या वापरासाठी आणि परफॉर्मेंससाठी तयार आहे. ऑडी क्यू2 भारतात कंपनीची सर्वात छोटी आणि सर्वात स्वस्त SUV असणार आहे. सध्या कंपनी या कॉम्पॅक्ट एसयुवीचे प्री- फेसलिस्ट वर्जन झळकवणार आहे.

नवी ऑडी कॉम्पेक्ट एसयुवीला फॉक्सवॅगन ग्रुपच्या MQB प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आले आहे. तसेच ही कंपनीच्या मॉडेल लाइनअप मध्ये Q3 च्या खाली ठेवण्यात येणार आहे. दरम्यान, Q2 ची लांबी 4190 मिमी, रुंदी 1749 मिमी आणि उंची 1508 मिमी आहे. खासियत म्हणजे आगामी कॉम्पॅक्ट एसयुवी लहान असली तरीही A3 प्रमाणे स्पेशियस असणार आहे. याच्या डिझाइन बद्दल बोलायचे झाल्यास यामध्ये एलईडी हेडलॅम्प्स LED DRLs सह सिंगल-फ्रेम ग्रिल, बम्परच्या येथे ब्लॅक क्लॅडिंग, व्हिल मेहराब आणि रनिंग बोर्ड, एक वाइड टेलगेट आणि स्क्वायर-ईश टेललॅप्स दिले गेले आहेत.(24.7 kmpl मायलेज देणारी Honda कंपनीच्या 'या' कारवर दिली जातेय जबरदस्त डिस्काउंट, जाणून घ्या अधिक)

ऑडी क्यू2 मध्ये 2.0 लीटर पेट्रोल इंजिन दिले गेले आहे. जे 190bhp ची पॉवर आणि 320Nm चे टॉर्क जनरेट करणार आहे. तसेच ऑडीच्या नव्या कॉम्पॅक्ट एसयुवीच्या स्पीड बद्दल बोलायचे झाल्यास ती 6.5 सेकंदात 0 ते 100 किमी प्रति तास स्पीड पकडण्यास सक्षम असणार आहे. तसेच कारची टॉप स्पीड 228 किमी प्रति तास असणार आहे. ट्रान्समिशनसाठी कारमध्ये क्वाट्रो ऑल-व्हिल ड्राइव्ह सिस्टमसह 7 स्पीड ड्युअल क्लच गिअरबॉक्स दिला जाणार आहे.