MG Gloster SUV Unveiled In India: भारतातील पहिली ऑटोनॉमस प्रीमियम एसयुव्ही एमजी ग्लॉस्टर लॉंन्च; बुकिंग सुरू
MG Gloster SUV Unveiled in India (Photo Credits; MG Motors India)

ऑटो क्षेत्रात अधिक प्रसिद्धी मिळवणारी कंपनी एमजी मोटार इंडियाने भारतातील पहिली ऑटोनॉमस प्रीमियम एसयुव्ही एमजी ग्लॉस्टर लॉन्च केली आहे. एमजी ग्लोस्टर भारतातील पहिली इंटरनेट कार हेक्टर आहे. लक्झरीयस फोर-व्ही ड्राइव्ह एमजी ग्लॉस्टरची प्रीबुकिंग आता एमजी मोटर इंडिया च्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तसेच भारतातील 200 पेक्षा जास्त केंद्रांवरही ही सुविधा आहे. ग्राहक त्यांच्या बहुप्रतिक्षित प्रीमियम एसयूव्हीला 1 लाख रुपयांत बुक करता येणार आहे. महत्वाचे म्हणजे, एमजी ग्लॉस्टर ही या सेगमेंटमधील पहिली अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टिम आहे. यातील काही वैशिष्ट्यांमध्ये अडाप्टिव्ह क्रुस कंट्रोल, ऑटोमॅटिक इमर्जन्सी ब्रेकिंग आणि ऑटोमॅटिक पार्किंग असिस्ट आदींचा सहभाग आहे. तर फॉरवर्ड कोलायजन वार्मिंग, लेन डिपार्चर वॉर्निंग आणि ब्लाइंड स्पॉट डिटेक्शन ही देखील वाहनाची वैशिष्ट्ये आहेत.

एमजी मोटर इंडिया चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राजीव छाबा म्हणाले की, “पहिल्या ऑटोनॉमस (लेव्हल १) प्रीमियम एसयूव्हीच्या लाँचिंगद्वारे आम्ही आज भारताच्या वाहन क्षेत्रात नवा अध्याय सुरू करत आहोत. एडीएएस तंत्रज्ञानासह आपला एकुणच ड्रायव्हिंगचा अनुभव वाढवण्यासाठी विविध परिस्थितींमध्ये ग्लॉस्टर चा सेन्स आणि निर्णयक्षमता पाहू शकता. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर- ग्लॉस्टर ही केवळ कार नसून, केवळ आपला आणि आपल्या सुरक्षिततेचा आणि आपल्या सोयीचा सदैव विचार करणारी हाय-टेक असिस्टंट आहे. सर्वोत्कृष्ट वैशिष्ट्ये, उच्च रोड प्रेझेन्स, पॉवरफुल क्षमता, लक्झरियस इंटेरिअर अशी ही नवी एमजी ग्लॉस्टर आता नवा बेंचमार्क प्रस्थापित करण्यासाठी सज्ज आहे.” हे देखील वाचा- भारतात नुकतेच लॉंंच झालेली MG Hector ने महिन्याभरात दुसऱ्यांदा घेतला पेट; कंपनीकडून कोणतीही प्रतिक्रिया नाही (Video)

एमजी ग्लॉस्टरचे सर्वोत्कृष्ट प्रकारात जागतिक मान्यताप्राप्त 118 पीएस पॉवरचे 2.0 डिझेल ट्विन टर्बो इंजिन आणि 480 एनएमटोर्क असून यामुळे ही या कॅटेगरीतील सर्वात पॉवरफुल एसयुव्ही असेल. यात सेगमेंट लिडिंग 12.3 इंच एचडी टचस्क्रीन असेल तसेच सेगमेंट-फर्स्ट कॅप्टन सिट्स असतील. 64 कलर अँबिएंट लायटिंग आणि पॅनोरमिक सनरुफ असेल. या एसयुव्हीमध्ये अॅगेट रेड, मेटल ब्लॅक, मेटल अॅश आणि वार्म व्हाइट असे चार रंग असणार आहेत.