भारतात नुकतेच लॉंंच झालेली MG Hector ने महिन्याभरात दुसऱ्यांदा घेतला पेट; कंपनीकडून कोणतीही प्रतिक्रिया नाही (Video)
MG Hector ला आग (संग्रहित संपादित प्रतिमा)

ब्रिटीश वाहन निर्माता कंपनी एम.जी. मोटर्स (MG Motors) ही भारतातील त्यांचे पहिले उत्पादन, हेक्टरसाठी (MG Hector) ओळखली जाते. भारतात लाँच झाल्यापासून हेक्टरला अनेकांनी पसंती दिली आहे. ही कार तिच्या नवीन लोडेड वैशिष्ट्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. सध्या हेक्टरचा एक व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ही कार रस्त्यावरच धुरामुळे पेटलेली दिसून येत आहे.

असे सांगण्यात येत आहे की, आग लागलेली कार हेक्टरचे पेट्रोल मॉडेल आहे. ही घटना दिल्लीत एलजी हाऊस रोडवर घडली आहे. या हेक्टरला तिच्या ग्राहकाने डिसेंबरमध्ये विकत घेतले होते आणि ही गाडी आतापर्यंत फक्त 9,000 किमी घावली आहे.

यापूर्वीही हेक्टरच्या डिझेल मॉडेलला मुंबईच्या बांद्रा येथे आग लागलेली होती. दोन्ही वेळेत आग गाडीच्या समोरच्या बाजूला लागली आहे. मात्र यामधील हा फरक सूचित करतो की, लागेलेली आग ही गाडीच्या इंधन प्रकारावर अवलंबून नाही किंवा त्याचा इंजिनशी काही संबंध नाही. ही आग कारमधील विद्युत बिघाडामुळे लागली असल्याचे सांगितले जात आहे. मात्र एमजी मोटर इंडियाने या दोन्ही घटनांवर अद्याप प्रतिसाद दिला नाही. (हेही वाचा: भारतातील पहिल्या Internet Car चे अनावरण, 5G फोनलाही होणार कनेक्ट; समाविष्ट आहेत विश्वास न बसणारे फीचर्स)

एमजी हेक्टर भारतात 1.5 लीटर 4 सिलिंडर युक्का टर्बो चार्ज पेट्रोल इंजिनसह येते. जे 141HP ची पॉवर आणि 250Nm चा टॉर्क जनरेट करते. यासह, हेक्टरला 2.0-लीटर डिझेल इंजिन देखील देण्यात आले आहे, जे 168BHP उर्जा आणि 350Nm टॉर्क जनरेट करते.

सध्या कंपनी या कारच्या बीएस 6 व्हर्जनवर काम करत आहे. परंतु याच्या किंमतीबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही. अहवालानुसार या कारच्या पेट्रोल व्हर्जनची किंमत 45,000 ते 60,000 आणि डिझेल मॉडेलची किंमत 1.25 लाख रुपयांनी वाढवली जाऊ शकते.